Join us

'हे' आहेत बॉलिवूडमधील महागडे दिग्दर्शक; एका चित्रपटासाठी घेतात कलाकारांपेक्षा जास्त मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:45 PM

1 / 8
कलाविश्वाविषयी प्रेक्षकांना कायमच कुतुहल असतं. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक दिग्गज व्यक्तीविषयी आणि त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्याचा नेटकऱ्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच कलाविश्वातील महागडे दिग्दर्शक कोण ते पाहुयात.
2 / 8
करण जोहर - प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येणार दिग्दर्शक म्हणजे करण जोहर.
3 / 8
कुछ कुछ होता है ,कभी ख़ुशी कभी गम ,कल हो ना हो असे असंख्य चित्रपट बॉलिवूडला देणारा करण एका चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतो.
4 / 8
रोहित शेट्टी - रोहित शेट्टी आणि त्यांच्या चित्रपटाविषयी काही वेगळं सांगायला नको. अॅक्शन, कॉमेडी आणि उत्तम कथानक रोहित शेट्टीच्या प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळते. त्यामुळे सध्याच्या घडीला तो लोकप्रिय दिग्दर्शक आहे.
5 / 8
गोलमाल, ऑल द बेस्ट, सिंघम, चेन्नई एक्स्प्रेस असे असंख्य चित्रपट करणारा रोहित एका चित्रपटासाठी ४० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं.
6 / 8
मणिरत्नम - दाक्षिणात्य कलाविश्वातील मोठं नावं म्हणजे मणिरत्नम. साऊथप्रमाणेच त्यांनी बॉलिवूडमध्येही काही चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. दिल से, साथिया, युवा, गुरु, रावण, ओके जानू हे त्यांचे काही चित्रपट गाजले आहेत. मणिरत्नम एका चित्रपटासाठी १२ कोटी रुपये मानधन घेतात.
7 / 8
राजकुमार हिराणी - बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून राजकुमार हिराणीकडे पाहिलं जातं. संजू, मुन्नाभाई एमबीबीएस, मिशन कश्मीर असे असंख्य सुपरहिट चित्रपट राजकुमार हिराणी यांनी दिले आहेत.
8 / 8
विशेष म्हणजे ते कलाविश्वातील महागडे दिग्दर्शक असून एका चित्रपटासाठी १८ ते २५ कोटी रुपये मानधन घेतल असल्याचं सांगण्यात येतं.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीकरण जोहररोहित शेट्टी