कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 5:21 PM1 / 9 बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान यालाही भीती वाटते, यावर भल्याभल्यांना विश्वास बसणार नाही.पण बाजीगर, डॉन असे जिगरबाज चित्रपट करणारा शाहरूखही घाबरतो. कशाला तर घोड्यांना. घोडेस्वारी करताना त्याला प्रचंड भीती वाटते. 2 / 9बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री दीपिका पादुकोणला कोणाला घाबरत असेल बरं? तर ती साप, अजगर यांना खूप घाबरते. तशी सापाची भीती सर्वांनाच असते पण फोबिया असल्यावर साप फोटो किंवा टीव्हीत पाहिल्यावरही भीती वाटते.3 / 9इशकजादे, गुंडे अशा चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करणारा अर्जुन कपूर हा सुद्धा कशाला भीतो, हे ऐकून जरा विचित्र वाटेल. पण हे खरं आहे. सीलिंग फॅनला तो प्रचंड घाबरतो. हा आपल्या डोक्यावर पडेल की काय, अशी भीती त्याला वाटते. त्यामुळे त्याने स्वत:च्या घरात एकही सीलिंग फॅन बसवलेला नाही. 4 / 9 अनुष्का शर्मा म्हणजे बॉलिवूडची धाकड अभिनेत्री. भूमिका कोणतीही असो ती लिलया पेलते. ‘रब ने बना दी जोडी’ या सिनेमात अनुष्का बाईक चालवताना दिसली होती. पण प्रत्यक्षात तिला बाईक चालवण्याची प्रचंड भीती वाटते. ‘मटरु की बिजली का मंडोला’ चित्रपटाचे शूटिंग यामुळेच थांबवावे लागले होते. 5 / 9अजय देवगणला खाताना घाणेरड्या हातांची प्रचंड भीती वाटते. खाताना हात खरकटे झाले की त्याचा वास काही केल्या जात नाही, असं त्याला वाटतं. त्याला याचा इतका फोबिया आहे की तो जवळजवळ सर्व काही खाण्यासाठी काटा, चमच्यांचा वापरतो. अगदी लाडू खायचा असेल तरीही तो चमचा मागवेल. 6 / 9अभिषेक बच्चन याला चक्क फळांचा फोबिया आहे. त्यामुळे तो कोणतंच फळ खात नाही म्हणे. अक्षरश: फळं दिसल्यावर तो पळून जातो. एका रिअॅलिटी शोमध्ये त्याने खुद्द ही कबुली दिली होती. त्याची ही विचित्र भीती ऐकून सगळेच अवाक् झाले होते. 7 / 9बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान एखाद्या गोष्टीला घाबरत असेल, यावर विश्वास बसणार नाही. पण तो घाबरतो ते बंद लिफ्टला. लिफ्टमध्ये बसून दरवाजा बंद झाल्यावर त्याला दडपण येते. त्यामुळे तो शक्यतो तो पायºया चढणं पसंत करतो. पण पर्याय नसेल तरच लिफ्ट वापरतो. सोनम कपूर हिलाही हाच फोबिया आहे. तिलाही लिफ्ट म्हटलं की ताण येतो. 8 / 9 ‘जिंदगी ना मिले दोबारा’ या चित्रपटात कतरिना कैफ टोमॅटो फेस्टिवलमध्ये धम्माल नाचली होती. पण वाचून आश्चर्य वाटेल की, तिला टोमॅटोचाच फोबिया आहे. होय, त्यासाठी तिने एका प्रसिद्ध टोमॅटो केचअपची ब्रँड अॅम्बिसीडर होण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफरही नाकारली होती. 9 / 9रणबीर कपूर दोन गोष्टींना प्रचंड घाबरतो. ते म्हणजे कोळी आणि झुरळ. त्याला याचा फोबिया आहे. आपण झुरळ पाहिलं की झाडू घेऊन धावतो पण रणबीर पळून जातो. आलिया भटला अंधाराची खूप भीती वाटते. अगदी झोपतानाही ती दिवे चालू ठेवून झोपते. पदडेही पूर्णपणे बंद करत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications