Join us

ट्वीटरवर ट्रेंड होतोय #FirstSalary, जाणून घ्या किती होती या स्टार्सची पहिली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 11:33 AM

1 / 12
ट्वीटरवर काय ट्रेंड होईल याचा नेम नाही. सध्या ट्वीटरवर काय ट्रेंड होतेय तर फर्स्ट सॅलेरी हा हॅशटॅग. बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार्स आज कोट्यवधी रूपये कमावतात. पण त्यांचा पहिला पगार तुम्हाला ठाऊक आहे?
2 / 12
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज अब्वाजवधी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहे. पण चित्रपटात येण्याआधी अमिताभ कोलकात्यात एका शिपींग कंपनीत नोकरीला होते. येथे त्यांचा पहिला पगार केवळ 500 रूपये होता.
3 / 12
साऊथ सुपरस्टार कमल हासन आज ‘बिग बॉस तामिळ’च्या एका एपिसोडसाठी 15 कोटी घेतो. पण याच कमलला त्याच्या डेब्यु सिनेमासाठी केवळ 500 रूपये मानधन मिळाले होते.
4 / 12
शाहरूख खान आज बॉलिवूडचा सर्वाधिक श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जातो. या शाहरूखची पहिली कमाई केवळ 50 रूपये होती. पंकज उधास यांच्या एका शोमध्ये अँकरिंगसाठी त्याला हे 50 रूपये मिळाले होते. या पहिल्या कमाईत एसआरकेने काय केले तर तो आग-याचा ताजमहाल पाहण्यासाठी गेला होता.
5 / 12
नॅशनल अवार्डवर नाव कोरणारा मल्याळम सुपरस्टार मोहनलाल याला पहिला सिनेमा ‘मंजिला वरिंजा पूक्कल’साठी मानधन म्हणून केवळ 2 हजार रूपये मिळाले होते. ही पहिली कमाई त्याने एका अनाथ आश्रमाला दान केली होती.
6 / 12
सोनम कपूरने हिरोईन होण्याआधी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. त्यावेळी तिला सॅलरी म्हणून केवळ 3 हजार रूपये मिळायचे. ती लोकल ट्रेनने कामाच्या ठिकाणी जायची.
7 / 12
बॉलिवूडचा मॅचो मॅन जॉन अब्राहमचा पहिला पगार 6 हजार 500 रूपये होता. तेव्हा तो अ‍ॅडव्हरटाइजिंग एजन्सीमध्ये काम करत होता.
8 / 12
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन अ‍ॅक्टिंगमध्ये येण्याआधी अ‍ॅनिमेशनचे काम करत होता. पहिल्या पगारापोटी त्याला 3500 रूपये मिळाले होते.
9 / 12
तामिळ सुपरस्टार अजीत कुमार 20 वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत आहे. करिअरच्या सुरुवातीला केवळ सपोर्टिंग रोल करणा-या अजीत कुमारची पहिली कमाई होती फक्त 2500 रूपये.
10 / 12
कन्नड सुपरस्टार सूर्याच्या पहिल्या कमाईची रक्कम किती होती माहितीये, तर केवळ 740 रूपये. आज सूर्या एका सिनेमासाठी कोट्यवधी रूपये घेतो.
11 / 12
अभिनेत्री सयानी गुप्ता हिची पहिली कमाई होती 12500 रूपये. एका पब्लिशिंग हाऊसमध्ये मार्केटींग व सेल्स एक्झिक्युटीव्हचे काम तिने केले होते.
12 / 12
दिग्दर्शक अनुभव सिन्हाने ट्वीटरवर त्यांची पहिली कमाई सांगितली आहे. 18 व्या वर्षी एका सातव्या वर्गाच्या मुलाच्या शिकवणीसाठी त्यांना 80 रूपये मिळाले होते आणि हे पैसे त्यांनी स्मोकिंगवर उडवले होते.
टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनशाहरुख खानकमल हासन