Join us

शाहरुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'किंग'! 'जवान' ते 'आदिपुरुष' 2023मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेले टॉप 10 सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 5:04 PM

1 / 11
२०२३मध्ये अनेक सुपरहिट सिनेमे प्रदर्शित झाले. यंदाचं वर्ष बॉलिवूडसाठी वरदान ठरलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. २०२३मध्ये बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या टॉप १० सिनेमांची यादी पाहुया.
2 / 11
२०२३मध्ये सुपरहिट ठरलेल्या सिनेमांपैकी दोन सिनेमे हे शाहरुख खानचे आहेत. अटली कुमार दिग्दर्शित शाहरुख मुख्य भूमिकेत असलेल्या 'जवान' सिनेमा या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या सिनेमाने देशात तब्बल ७६४ कोटींचा गल्ला जमवला. तर जगभरात ११५० कोटी कमावले.
3 / 11
यंदाच्या वर्षात शाहरुख बॉक्स ऑफिसचा किंग ठरला. २०२३मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या सिनेमांच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पठाण आहे. हा सिनेमा वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. 'पठाण'ने देशात ६५४ कोटींचा तर जगभरात १०५० कोटींचा गल्ला जमवला.
4 / 11
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं. अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने देशात आत्तापर्यंत ६३९ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात ८८० कोटींचा बिझनेस केला.
5 / 11
२००१ साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' सिनेमाचा सीक्वल 'गदर २' ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झाला. सनी पाजीच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं होतं. 'गदर २' ने देशात ६२४ कोटींचा गल्ला जमवला. तर वर्ल्डवाइड ६९० कोटींची कमाई केली होती.
6 / 11
साउथ सुपरस्टार विजय आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेल्या 'लिओ' सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. या सिनेमाने देशात ४११ कोटींची कमाई केली होती. तर जगभरात ६१५ कोटींचा गल्ला जमवला.
7 / 11
सुपरहिटच्या लिस्टमध्ये मागे राहतील ते रजनीकांत कसले. 'जेलर'मधून रजनीकांत यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमामे जगभरात तब्बल ६०५ कोटींचा गल्ला जमवला होता.
8 / 11
सलमान खान आणि कतरिना कैफच्या 'टायगर ३' चीही बॉक्स ऑफिसवर हवा पाहायला मिळाली. या सिनेमाने जगभरात ४६६ तर देशात ३४२ कोटींची कमाई केली.
9 / 11
वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होऊनही प्रभासच्या 'सालार'ने २०२३मधील सुपरहिट सिनेमांमध्ये स्थान मिळवलं आहे. पाच भाषांमध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने अवघ्या १० दिवसांत देशात ३३० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने ४२८ कोटींची कमाई केली आहे.
10 / 11
ट्रोलिंग, कॉन्ट्रोव्हर्सी, संवाद आणि व्हीएफएक्सचा वाद असूनही ओम राऊतचा 'आदिपुरुष' २०२३च्या हिट सिनेमांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. या सिनेमाने देशात ३४९ तर जगभरात ४१० कोटींचा बिझनेस केला आहे.
11 / 11
आलिया आणि रणबीर मुख्य भूमिकेत असलेला 'रॉकी और रानी की प्रेमकहाणी' सिनेमा २०२३मधील सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाने जगभरात ३५५ कोटींची कमाई केली.
टॅग्स :फ्लॅशबॅक 2023शाहरुख खानपठाण सिनेमाआदिपुरूषसिनेमा