अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट! By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 6:44 PM1 / 10सध्या बॉलिवूडमध्ये ॲक्शन चित्रपटांचा ट्रेंड आहे. सर्व निर्माते आणि दिग्दर्शक ॲक्शनपॅक्ड चित्रपट बनवत असून प्रेक्षक या चित्रपटांना भरभरून प्रेम देत आहेत.2 / 10चित्रपटांमध्ये कलाकार अप्रतिम स्टंट करताना दिसतात. स्टंट करताना बहुतेक कलाकार बॉडी डबल्स वापरतात. परंतु इंडस्ट्रीमध्ये असे काही अभिनेते जे स्वतःचे स्टंट करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया.3 / 10अभिनेता अजय देवगनदेखील त्याचे स्टंट करताना मागेपुढे पाहत नाही. अजयने अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो प्रसिद्ध स्टंट समन्वयक वीरू देवगणचा मुलगा आहे. 4 / 10 बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा खिलाडी कुमार म्हणूनही ओळखले जाते. मार्शल आर्ट्समध्ये निपुण असलेला अक्षय स्वत: स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.5 / 10टायगर श्रॉफ हा अभिनेतादेखील त्याच्या सर्व चित्रपटांमध्ये एकट्याने सर्व स्टंट करतो. त्याने यात प्रभुत्व मिळवलं आहे.6 / 10हृतिक रोशनला स्वतःचे स्टंट करायला आवडतात. तो खूप तंदुरुस्त आहे, ज्यामुळे तो या गोष्टी सहज करू शकतो. हृतिकने 'धूम 2', 'क्रिश' आणि 'वॉर' सारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केलं आहे.7 / 10अभिनेता जॉन अब्राहमने बहुतांश ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांमध्ये तो अनेक स्टंट करताना दिसला आहे. यात तो अनेकवेळा जखमीदेखील झाला आहे.8 / 10बॉलिवूडचा असा एक अभिनेता आहे जो अशक्य असे स्टंट शक्य करुन दाखवू शकतो. या अभिनेत्याचं नाव आहे विद्युत जामवाल. विद्युत मूळ जम्मूचा असून तो अभिनयासह मार्शल आर्टिस्ट आणि स्टंट परफॉर्मरही आहे. बॉलिवूडसोबतच टॉलिवूड आणि कॉलिवूडमध्येही त्याने काम केलं आहे.9 / 10फक्त अभिनेतेच नाही तर अभिनेत्रीदेखील स्वत:च खतरनाक स्टंट केले आहेत. प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये ॲक्शन अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्रियांकानेच एका मुलाखतीत सांगितले होते की, 'क्वांटिको'मधील सर्व स्टंट तिने स्वतः केले आहेत.10 / 10'टायगर जिंदा है' आणि 'धूम 3' या सिनेमामध्ये कतरिना कैफने बहुतेक स्टंट स्वतः केले आहेत. तर कतरिना कैफने बँग बँगमध्ये तिचे सर्व स्टंट स्वतः केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications