Join us

Allu Arjun पासून KGF 2 स्टार Yash पर्यंत, एका चित्रपटासाठी हे साउथचे स्टार्स घेतात इतकं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 1:34 PM

1 / 10
हल्ली साउथच्या चित्रपटांना कोणीही टक्कर देऊ शकत नाही. साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट असो किंवा राम चरणचा 'RRR' असो. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात साउथ सिनेइंडस्ट्रीतील हे सुपरस्टार्स एका सिनेमासाठी किती पैसे घेतात
2 / 10
साउथच्या चित्रपटांचा देव म्हटल्या जाणार्‍या रजनीकांत यांच्याबद्दल तुम्हा सर्वांना माहित असेलच. पण तुम्हाला माहित आहे का, की ते एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतात.
3 / 10
KGF 2 मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या यशने या चित्रपटासाठी करोडो रुपये घेतले आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्याने या चित्रपटासाठी २० कोटींहून अधिक पैसे घेतले आहेत.
4 / 10
रिपोर्ट्सनुसार राम चरणने RRR या चित्रपटासाठी ४५ कोटींहून अधिक मानधन आकारले होते.
5 / 10
या यादीत थलापती विजयचेही नाव आहे. एका चित्रपटासाठी तो २० कोटी रुपये मानधन घेतो.
6 / 10
बाहुबली या चित्रपटातून आपला ठसा उमटवणारा प्रभास हा साउथ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सध्या तो एका चित्रपटात काम करण्यासाठी ८० ते ८५ कोटी रुपये घेत आहे.
7 / 10
टॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक महेश बाबू यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एका चित्रपटासाठी तो ४५ कोटी रुपये घेतो.
8 / 10
साउथच्या काही स्टार्सनीही बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. त्यापैकी एक नाव कमल हसन यांचेही आहे. रिपोर्टनुसार, कमल हसन एका चित्रपटासाठी २५ कोटी रुपये घेतात.
9 / 10
साउथचा मोस्ट स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुन पुष्पा या चित्रपटासाठी ५० कोटी रुपये फी घेतली होती.
10 / 10
राम चरणसोबत RRR चित्रपटात दिसलेल्या ज्युनियर एनटीआरचाही या यादीत समावेश आहे. एका चित्रपटासाठी तो ४५ कोटी रुपये मानधन घेतो.
टॅग्स :यशकेजीएफमहेश बाबूरजनीकांतज्युनिअर एनटीआरराम चरण तेजा