Join us

विश्वास ठेवा! ‘हे’ सिनेमे नाकारले नसते तर आज बॉबी देओल सुपरस्टार असता...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 12:22 PM

1 / 6
बॉबी देओलचा आज 53 वा वाढदिवस. देओल ब्रदर्समध्ये सर्वात लहान असलेल्या बॉबीला भाऊ सनी देओल व वडील धर्मेन्द्र यांच्यासारखं यश मिळवता आला नाही. याचं कारण म्हणजे त्यानं केलेल्या काही चुका. होय, बॉबीने अनेक सिनेमे नाकारले आणि हे सिनेमे नाकारले नसते तर कदाचित आज तो सुद्धा सुपरस्टार असता...
2 / 6
जब वी मेट हा शाहिद कपूर व करिना कपूरचा सिनेमा तुफान गाजला. पण हा सिनेमा सर्वप्रथम बॉबीला ऑफर झाला होता आणि त्याच्या अपोझिट या सिनेमात आयशा टाकिया दिसणार होती. पण दोघांनीही हा सिनेमा करण्यास नकार दिला. यानंतर या सिनेमासाठी शाहिद व करिनाला साईन करण्यात आलं. या सिनेमाने शाहिद एका रात्रीत स्टार झाला.
3 / 6
करण अर्जुन या सिनेमातही मेकर्स सनी देओल व बॉबी देओल या दोन भावांना घेऊ इच्छित होते. पण दोघांनीही सिनेमा नाकारला. त्यावेळी बॉबी त्याचा डेब्यू सिनेमा ‘बरसात’मध्ये बिझी होता. त्याचे लक्ष विचलित होऊ नये, म्हणून सनीने ‘करण अर्जुन’साठी नकार दिला. परिणाम काय झाला तर बॉबीच्या हातून एक ब्लॉकबस्टर सिनेमा निसटला.
4 / 6
दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘युवा’ हा सिनेमा नाकारण्याची चूकही बॉबीने करिअरमध्ये केली. या चित्रपटात मेकर्स बॉबीला घेऊ इच्छित होते. पण बॉबीला तीन हिरोंची कल्पना आवडली नाही आणि त्याने हा सिनेमा नाकारला. त्याच्या जागी नंतर मेकर्सनी अजय देवगणला साईन केलं.
5 / 6
36 चायना टाऊन हा सिनेमाही बॉबीने नाकारला. अब्बास-मस्तान जोडीने बॉबीला डोळ्यांपुढे ठेवूनही हा सिनेमा लिहिला होता. पण बॉबीने ऑफर धुडकावून लावली. त्याच्या जागी या चित्रपटात शाहिद कपूरची एन्ट्री झाली.
6 / 6
ये जवानी है दीवानी हा रणबीर व दीपिकाचा गाजलेला सिनेमा. यात आदित्य रॉय कपूरचीही भूमिका होती. आदित्यची भूमिका सर्वप्रथम बॉबीला ऑफर झाली होती. पण त्याने ती नाकारली.
टॅग्स :बॉबी देओलबॉलिवूड