Join us

सामंथा रूथ प्रभू ते रश्मिका मंदाना, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 12:09 PM

1 / 12
प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीतील हिरो सध्या एका सिनेमासाठी मोठं मानधन घेत आहेत. पण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री मात्र अजूनही मानधनाच्या बाबतीत हिरोंपेक्षा मागे आहेत. अभिनेत्रींमध्ये स्पर्धाही मोठी आहे. अशात काही अभिनेत्रींनी त्यांचं मानधन वाढवलं आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री एका सिनेमासाठी किती मानधन घेतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
2 / 12
अनुष्का शेट्टी - 'बाहुबली' फेम देवसेना म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शेट्टी साऊथमधील एक टॉपची अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये आपल्या कामाने तिने छाप पाडली आहे. अनुष्का एका सिनेमासाठी ६ कोटी रूपये मानधन घेते. आधी हे मानधन कमी होतं. बाहुबलीच्या यशानंतर तिने मानधन वाढवलं.
3 / 12
सामंथा रूथ प्रभू - साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक सामंथा ही एका सिनेमासाठी ३ ते ४ कोटी रूपये मानधन घेते. मात्र, तिने नुकत्याच केलेल्या 'पुष्पा' सिनेमातील आयटम नंबरसाठी तब्बल ५ कोटी रूपये मानधन घेतलं. आता सिनेमासाठीही ती यापेक्षा जास्त मानधन घेईल.
4 / 12
रश्मिका मंदाना - आता सर्वांच्या मनात घर केलेली नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली रश्मिका मंदाना एका सिनेमासाठी २ कोटी रूपये मानधन घेते. नुकतंच तिने 'पुष्पा' सिनेमाच्या सिक्वलसाठी आपलं मानधन वाढवलं आहे. ती या सिनेमासाठी ४ कोटी रूपये घेणार आहे.
5 / 12
किर्थी सुरेश - नॅशनल अवॉर्ड विजेती अभिनेत्री किर्थी सुरेश साऊथच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका सिनेमासाठी २ कोटी रूपये मानधन घेते.
6 / 12
पूजा हेगडे - पूजा हेगडे ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती प्रभाससोबत आगामी 'राधे श्याम' सिनेमात दिसणार आहे. ती एका सिनेमासाठी ४ कोटी रूपये इतकं मानधन घेते. ती साऊथमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
7 / 12
नयनतारा - नयनतारा ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती लवकरच बॉलिवूड सिनेमात शाहरूख खानसोबत दिसणार आहे. ती एका सिनेमासाठी ३ ते ७ कोटी रूपये मानधन घेते.
8 / 12
तापसी पन्नू - तापसीने तिच्या करिअरची सुरूवात २०१० मध्ये तमिळ सिनेमातून केली होती. त्यानंतर बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सिनेमांमध्ये ती दिसली. ती एका सिनेमासाठी ३ ते ५ कोटी रूपये मानधन घेते.
9 / 12
काजल अग्रवाल - काजल अग्रवालने २००२ मध्ये 'क्यू हो गया ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. पण नंतर ती तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्ये काम करू लागली. तिचा मगधीरा हा सुपरडुपर हिट ठरला होता. ती एका सिनेमासाठी १.५ ते ५ कोटी रूपये मानधन घेते.
10 / 12
रकुलप्रीत सिंह - रकुलने २००९ मध्ये कन्नड सिनेमातून डेब्यू केलं होतं. तिने २०१४ मध्ये यारीयां या बॉलिवूड सिनेमातही काम केलं होतं. ती एका सिनेमासाठी १.५ ते ३ कोटी रूपये मानधन घेते.
11 / 12
तमन्ना भाटिया - तमन्ना तमिळ आणि तेलुगू सिनेमात काम करते. काही बॉलिवूड सिनेमातही ती दिसली. ती एका सिनेमासाठी १.५ कोटी ते ३ कोटी रूपये मानधन घेते.
12 / 12
श्रुती हसन - गायिका, अभिनेत्री श्रुती हसन प्रामुख्याने तेलुगू, तमिळ आणि हिंदी सिनेमात काम करते. तिने २००९ मध्ये लक या हिंदी सिनेमातून डेब्यू केलं होतं. ती एका सिनेमासाठी १ ते ५ कोटी रूपये मानधन घेते.
टॅग्स :Tollywoodरश्मिका मंदानासमांथा अक्कीनेनीतापसी पन्नूअनुष्का शेट्टी