Join us

'किंग खान'च्या सिनेमासोबत रिलीज झाला, १२५ कोटींचा गल्ला जमवला! पाहिलाय का हा चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 10:06 IST

1 / 9
बॉक्स ऑफिसवर बिग बजेट चित्रपटांपेक्षा कमी बजेट असलेले सिनेमे चांगलेच गाजले. तर नव्या वर्षात प्रदर्शित झालेला राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा बिग बजेट 'गेम चेंजर' चित्रपट फ्लॉप ठरला.
2 / 9
गेल्या वर्षी २०२४ मध्ये 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'बेबी जॉन' हे मोठ्या बजेटचे चित्रपट फ्लॉप झालेत. तर 'कांतारा' असो 'स्त्री २' असो किंवा 'मुंज्या' या छोट्या बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.
3 / 9
ब्लॉकबस्टर चित्रपट बनवायचा असेल तर त्यासाठी खूप मोठे बजेट असावे लागत नाही. कथा आणि कलाकार चांगले असतील तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होऊ शकतो. याचेच उत्तम उदाहरण आहे बॉलिवूड चित्रपट 'फुकरे ३' (Fukrey 3).
4 / 9
रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, पंकज त्रिपाठी आणि वरुण शर्मा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी 'जवान' सोबत प्रदर्शित होणार होता. पण निर्मात्यांनी प्रदर्शन ३ आठवड्यांसाठी पुढे ढकललं आणि चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. त्याच दिवशी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' देखील प्रदर्शित झाला होता.
5 / 9
'फुकरे ३' चित्रपटानं शाहरुख खानच्या मेगा बजेट 'जवान' आणि 'द व्हॅक्सिन वॉर'ला टक्कर देत बॉक्स ऑफिसवर हळूहळू १०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली.
6 / 9
'जवान' हा चित्रपट दीड महिन्यांहून अधिक काळ बॉक्स ऑफिसवर राहिला. सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, 'जवान'चं बजेच हे ३०० कोटी रुपये होते. या चित्रपटाने भारतात ७६० कोटी आणि परदेशात ४०० कोटी कमावले. चित्रपटाचे एकूण कलेक्शन ११६० कोटी रुपये होते.
7 / 9
तर 'फुकरे ३' हा फक्त ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. त्यानं भारतात ११३.२५ कोटी रुपये आणि परदेशात १४.५ कोटी रुपये कमावले.
8 / 9
जर तुम्ही अद्याप हा सिनेमा पाहिला नसेल तर तो अ‍ॅमझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
9 / 9
फुकरे हा २०१३ मध्ये रिलीज झाला. त्यानंतर २०१७ मध्ये फुकरे रिटर्न्स रिलीज झाला. त्यानंतर 5 वर्षांनी २०२४ मध्ये त्याचा तिसरा भाग प्रदर्शित झाला होता.
टॅग्स :सिनेमारिचा चड्डाअली फजलपंकज त्रिपाठीशाहरुख खानराम चरण तेजाबॉलिवूड