संसदेत सनी देओलने ४ वर्षात विचारला १ प्रश्न; उपस्थितीही केवळ १८ टक्के By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 3:05 PM1 / 10भाजप खासदार आणि लोकप्रिय अभिनेता सनी देओल गदर-२ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. गदर-२ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींची कमाई केलीय. 2 / 10केवळ ११ दिवसांत गदर-२ चित्रपटाने ही कमाल करून दाखवली. मात्र, याचदरम्यान, आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सनी देओलने जाहीर केले. 3 / 10अभिनेता सनी देओलने आपला राजकीय प्रवास २०१९ मध्ये सुरू केला. भाजपच्या तिकिटावर पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओल खासदार बनला. मात्र, खासदार म्हणून सनीची कारकिर्द लक्षवेधी ठरली नाही. 4 / 10राजकारणात येताच सनी देओलचा अपेक्षा भंग झाला, सनी देओलच्या राजकीय कारकिर्दीने त्याच्या चाहत्यांचाही अपेक्षा भंग झाल्याचं दिसून आलं. 5 / 10आपल्या खासदारकीच्या ४ वर्षांच्या कार्यकाळात सनी देओलने केवळ १ प्रश्न लोकसभेत विचारला. तर, उपस्थितीही फक्त १८ टक्के लावली. संसदेतील खासदारांची सरासरी उपस्थिती ७९ टक्के एवढी आहे. 6 / 10संसदेतील खासदारांच्या उपस्थितीत पंजाबमधील खासदारांची उपस्थिती सरासरी ७० टक्के आहे. मात्र, सनी देओलने केवळ १८ टक्के उपस्थिती दर्शवली. 7 / 10सनी देओलने एकही विधेयक संसदेत ठेवले नाही, तर संसदेतील कुठल्याही चर्चेत त्याचा सहभाग दिसून आला. त्यावरुन, अभिनेत्याची नेतेगिरीत रुची नसल्याचे स्पष्ट होते. 8 / 10 दरम्यान, गुरुदासपूर मतदारसंघात सनी देओलची उपस्थिती आणि संसदेतील उपस्थिती जवळपास सारखीच आहे. त्यामुळेच, स्थानिक नेते अमरजोत सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सनी देओलची खासदारकी रद्द करण्याचीही मागणी केली होती. 9 / 10 सनी देओलने आजतकशी बोलताना यापुढे निवडणुका लवढणार नसल्याचे स्पष्ट केले. संसदेत देश चालवणारे लोक बसतात, सर्वपक्षीय लोक असतात. मात्र, त्यांचा व्यवहार पाहून आश्चर्य वाटतं. 10 / 10आपण इतर लोकांना सांगतो, असं वागू नका. मात्र, ससंदेतील व्यवहार पाहून मी त्यांच्यातला नाही, असे मला वाटते. म्हणून, मी अभिनयाच्या क्षेत्रातच ठीक आहे. राजकारणात आता जाणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications