Join us

"मला ड्रग्स दिले, माझा न्यूड व्हिडीओ शूट केला"; आदिल दुर्रानीचे राखी सावंतवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 5:02 PM

1 / 7
बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत नेहमीच प्रसिद्धीझोतात येत असते. कधी पर्सनल लाइफमुळे तर कधी तिच्या विधानांमुळे.राखी सावंत तिच्या लग्नानंतर खूप चर्चेत राहिली आहे. अभिनेत्रीने अचानक आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सर्वांना हैराण केले होते.
2 / 7
लग्नाच्या काही दिवसानंतर राखीने आदिलवर बरेच गंभीर आरोप केले होते आणि पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. ६ महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर आता तो तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर त्याने प्रेस कॉन्फरन्स घेत राखी सावंतवर गंभीर आरोप केले आहेत.
3 / 7
आदिलने मुलाखतीत सांगितले की, राखीने त्याला ड्रग्स देऊन तिचा न्यूड व्हिडीओ शूट केला होता. इतकेच नाही तर आदिलने राखी सावंतबाबत आणखी काही पर्दाफाश केला.
4 / 7
आदिल खानने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राखी सारखी ज्या बायका असतात त्यांच्याशी बोलणं खूप डेंजरस असते. राखीने मला एक टॅबलेट दिली होती. तिने मला ड्रग्स दिले.
5 / 7
त्यानंतर तिने व्हिडीओ कॉलवर माझा न्यूड व्हिडीओ बनवला जेव्हा मी बाहेर होतो आणि की मुंबईत होती, असे त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, राखीने रितेशला घटस्फोट दिला नाही आणि आताही ती विवाहित आहे.
6 / 7
आदिल म्हणाला की, आज मी या चॅनेलवरुन सांगू इच्छितो की, राखी माझ्यापेक्षा १९ वर्षे मोठी आहे. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिच्या आईवरही होते. खरे सांगू तर मी तिच्या आईचा आवडता व्यक्ती होतो.
7 / 7
आदिल दुर्रानीने या मुलाखतीत राखी सावंतवर बरेच आरोप केले आहेत. आता राखी सावंत यावर काय प्रत्युत्तर देते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
टॅग्स :राखी सावंत