बाबो! आयपीएल मॅचच्या तिकिटांवरून सुरु झाली हरभजन सिंगची लव्हस्टोरी, युवराज सिंगने केली होती त्याला अशी मदत By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 1:07 PM1 / 10क्रिकेटर हरभजन सिंग याची पत्नी गीता बसरा ऐकाकाळीची बॉलिवूडची अभिनेत्री आहे. आज गीता तिचा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)2 / 10 2006 मध्ये आलेल्या इमरान हाश्मीचा सिनेमा 'दिल दिया है'मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. गीता गेल्या काही वर्षांपासून ती बॉलिवूडपासून दूर आहे.(Photo Instagram)3 / 10यानंतर 2007 मध्ये ती पुन्हा इमरानसोबत 'द ट्रेन'मध्ये झळकली होती.मात्र या सिनेमाला म्हणाव तसं यश मिळू शकलं नाही. (Photo Instagram)4 / 10हरभजनने गीताला वो अजनबी गाण्यात पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला आवडली होती. युवराज सिंगच्या मदतीने त्यांने गीताचा नंबर शोधला. गीताला मेसेज करत तिला कॉफी डेटवर बोलवले होते. (Photo Instagram)5 / 10गीताने 3 ते 4 दिवस त्याच्या मेसेजचा रिप्लॉय दिला नव्हता. भज्जी त्यावेळी साऊथ आफ्रिकेत होता आणि भारताने T-20 वर्ल्ड कप जिंकला होता. ज्यावेळी हरभजन भारतात परतला तेव्हा गीताने त्यांचे अभिनंदन केले होते. (Photo Instagram)6 / 10त्यानंतर गीताने हरभजनला मेसेज करुन आयपीएल मॅचची दोन तिकिटं मागितली होती. हरभजनने तिला तिकिट्स दिली आणि आयपीएल दरम्यान दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. (Photo Instagram)7 / 102015 मध्ये हरभजन आणि गीताने गेल्या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. (Photo Instagram)8 / 10सुमारे पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. एका गुरुद्वारात त्यांनी लग्न केले होते. (Photo Instagram)9 / 10लग्नानंतरही गीता सिनेमांमध्ये काम करत होती. गीता आणि हरभजनला हिाना नावची गोंडस मुलगी आहे. (Photo Instagram)10 / 10सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications