SEE PICS : जेनेलिया वहिनी कमबॅकसाठी सज्ज...! आईच्या भूमिका करायलाही तयार By रूपाली मुधोळकर | Published: October 02, 2020 11:49 AM1 / 12अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजा लग्नानंतर फिल्मी करिअर सोडून संसारात रमली. पाठोपाठ मुलांच्या संगोपणात बिझी झाली. पण आता वहिनीसाहेब पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज आहेत.2 / 12होय, आता जेनेलियाला पुन्हा एकदा अभिनय खुणावू लागला आहे. बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.3 / 12एका न्यूज पोर्टलशी बोलताना तिने स्वत: ही माहिती दिली. कुटुंबासोबत वेळ घालवताना मी सोबत सोबत कॅमेराही मिस करतेय. कदाचित आता ती वेळ आलीये, असे जेनेलिया म्हणाली.4 / 12‘ मी लाइफ सेटल करताना प्रत्येक गोष्टीबाबत क्लिअर होते. पती रितेश देशमुख आणि रियान व राहिल यांच्यासोबत वेळ घालवायचा होता. त्यांच्यासोबत राहायचे होते. सेटवर लहान मुलांबद्दल विचार करून मला ताण घ्यायचा नव्हता. काम करताना अन्य कोणताही विचार मनात येता कामा नये, असे मला वाटायचे. आता मुलं बºयापैकी मोठी झाली आहेत. आता मी नि:संकोच कामावर परतू शकते,’ असे ती म्हणाली.5 / 12 मुलं ब-यापैकी सेटल झाली आहेत. आता मी काम करू शकते. कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करू शकते, असेही ती म्हणाली.6 / 12आताश: बॉलिवूडमधील विविध भूमिका पाहून मी खूप उत्साही होते. बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी मी चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे. अगदी आईची भूमिका करायलाही मी तयार आहे. अर्थात ती भूमिका सशक्त हवी. आईची भूमिका वा माझ्या वयाला साजेशा भूमिका करण्यात मला कुठलाही संकोच नाही. अशा भूमिकांसाठी माझ्या मनात जराही नकारात्मकता नाही. जर अशा भूमिकांसोबत मी स्वत: कनेक्ट करू शकते तर ते काम मी नक्की करीन, असेही जेनेलिया म्हणाली.7 / 122003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जेनेलिया त्याची हिरोईन होती. 8 / 12याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती. हैदराबाद विमानतळावर दोघेही पहिल्यांदा भेटले. आश्चर्य वाटेल, पण या पहिल्या भेटीत जेनेलियाने रितेशला जराही भाव दिला नव्हता.9 / 12कारण त्यावेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याने रितेश गर्विष्ठ असेल, असा जेनेलियाचा समज होता. त्यामुळे त्याने अॅटिट्यूड दाखवण्यापूर्वी जेनेलियानेच त्याला अॅटिट्यूड दाखवायला सुरुवात केली होती.10 / 12हैदराबाद विमानतळावर रितेशने जेनेलियाला हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. जेनेलियाने हस्तांदोलन तर केले. पण न करावे अशा थाटात. पहिल्याच भेटीतील जेनेलियाच्या हे वागणे रितेशला खटकले. पण तो शांत राहिला. पुढे चित्रपटाच्या सेटवर रितेशचा खरा स्वभाव जेनेलियाला हळूहळू कळू लागला आणि दोघांत मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले, हेही दोघांना कळले नाही.11 / 12‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या चित्रपटात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. 12 / 12पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 2012 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. आता या दोघांना दोन मुलं आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications