'कॉमेडी सर्कस'च्या गंगुबाईने घटवलं २२ किलो वजन; आता दिसते प्रचंड ग्लॅमरस By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 11:11 AM1 / 11‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली चिमुकली गंगुबाई आठवते का? अर्थात अनेक प्रेक्षकांच्या स्मरणात ही चिमुकली गंगुबाई नक्कीच असेल.2 / 11बालकलाकार सलोनी डॅनी हिने ही भूमिका साकारली होती. केवळ ही भूमिका साकारलीच नाही. तर कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.3 / 11लहान पणी गोबऱ्या गालांची, सतत बडबड करणारी प्रत्येक प्रेक्षकाला, चाहत्याला आवडायची. मात्र, सलोनी जसजशी मोठ होत गेली. तसं तिच्या वजनावरुन तिची अनेकांनी खिल्लीही उडवली.4 / 11मित्रपरिवारातील काही जणांनीदेखील तिला ट्रोल केलं. त्यामुळेच वजन कमी करायच्या जिद्दीने पेटलेल्या सलोनीने चक्क २२ किलो वजन कमी केलं आहे.5 / 11कलाविश्वाप्रमाणेच सलोनी सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळेच तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.6 / 11सलोनीमध्ये पूर्वीपेक्षा आता प्रचंड बदल झाला असून ती अत्यंत ग्लॅमरस दिसत असल्याचं पाहायला मिळतं.7 / 11सलोनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कलाविश्वात सक्रीय आहे. तिने काही हिंदी व मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे.8 / 11अभिनेता शाहरुख खानसोबतही सलोनीने स्क्रीन शेअर केली आहे.9 / 11सलोनी 'कॉमेडी सर्कस', 'नमुने', 'बडे भैय्या की दुल्हन', 'तेढी मेढी फॅमिली', 'यह जादू है – जीन का', या मालिकांमध्ये झळकली आहे. 10 / 11सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सलोनीने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.11 / 11सलोनीला फोटोशूटची प्रचंड आवड असून अनेकदा ती तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications