Join us  

टपोरे डोळे आणि निरागस चेहरा; कोट्यवधींची कमाई करणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 2:05 PM

1 / 12
टपोरे टोळे आणि निरागस चेहरा असलेली, फोटोत दिसणारी ही चिमुकली आज एक लोकप्रिय स्टार आहे. साऊथ चित्रपटांमध्ये मोठं नाव कमावल्यानंतर ही अभिनेत्री लवकरच एका मोठ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
2 / 12
महेश बाबू, अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा यांसारख्या स्टार्ससोबत काम केलं असून ती त्यांची देखील आवडती हिरोईन आहे. एका मोठ्या प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्मात्याशी लग्न केलं. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. ही अभिनेत्री म्हणजे समंथा रुथ प्रभू.
3 / 12
'यशोदा' आणि 'शकुंतलम' नंतर समंथाने विजय देवरकोंडासोबत 'खुशी' नावाचा चित्रपट केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केलं आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आणि त्याला चांगलं यश मिळालं.
4 / 12
समंथा काही काळापासून मायोसिटिसने त्रस्त होती, परंतु ती या आजारातून बरी झाली आहे. या आजारातून बरे झाल्यानंतर समंथाला आणखी एका आजाराने ग्रासल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. अमेरिकेत काही दिवस उपचार घेतले होते, पण ही नवीन समस्या मायोसिटिससारखी भयंकर नाही.
5 / 12
मायोसिटिसने त्रस्त असलेल्या समंथाने यशोदा चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान तिच्या चाहत्यांसोबत हे शेअर केले. याशिवाय तिच्यावर उपचारही सुरू आहेत, मात्र या उपचारादरम्यान तिने भरपूर स्टेरॉईड्सचा वापर केला.
6 / 12
समंथा सिटाडेल नावाच्या वेब सीरिजमध्ये काम करत आहे. ही वेब सिरीज लवकरच Amazon Prime Video वर प्रसारित होणार आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असून ती सलमान खानसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे.
7 / 12
धर्मा प्रॉडक्शनच्या अंतर्गत करण जोहर निर्मित विष्णुवर्धनच्या चित्रपटात सामंथाला मुख्य अभिनेत्री म्हणून फायनल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सिटाडेल वेब सीरिजचे दिग्दर्शन राज आणि डीके करत आहेत.
8 / 12
अभिनेता वरुण धवन आणि समंथा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजचे शूटिंग सध्या वेगाने सुरू आहे. समंथाने तिचे शूटिंग पूर्ण केले आहे. साधारणपणे समंथा तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी चार ते पाच कोटी रुपये घेते, मात्र यासाठी दहा कोटी रुपये फी मिळाल्याचे म्हटले जात आहे.
9 / 12
समंथा आणि नागा चैतन्य एका चित्रपटादरम्यान प्रेमात पडले आणि 7 वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 7 ऑक्टोबर 2017 रोजी दोघांचे लग्न झाले.
10 / 12
अवघ्या 4 वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये दोघांनी वेगळे होत असल्याची घोषणा केली. आता दोघेही आपापल्या आयुष्यात खूप आनंदी आहेत.
11 / 12
12 / 12
टॅग्स :बॉलिवूड