दोनदा गोविंदावर आली होती घटस्फोटाची वेळ, पत्नी सुनीताला तरी होता 'चीची'वर विश्वास.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 11:45 AM1 / 12बॉलिवूडमध्ये 'चीची' नावाने लोकप्रिय गोविंदासाठी आजचा दिवस खास आहे. गोविंदा आज ५७ वर्षांचा झाला आहे. हिरो नंबर १, कुली नंबर १, बड़े मियां-छोटे मियां, हत्या, इल्जाम, हसीना मान जाएगी, आंखें, जोड़ी नंबर वन आणि मुकाबला सारख्या एकापेक्षा एक सिनेमातून गोविंदान लोकांचं भरभरून मनोरंजन केलं. बॉलिवूडमधील त्याचे अफेअर्सही अनेकदा चर्चेचा विषय ठरले होते. आज आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत ज्याने गोविंदावर घटस्फोटाची वेळ आली होती.2 / 12बॉलिवूडमध्ये गोविंदाची जोडी सर्वातआधी नीलमसोबत बनली होती. खुदगर्ज, लव ८६, दो कैदी, इल्जाम, हत्या आणि सिंदूरसहीत साधारण १० सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. नीलम आणि गोविंदाची जोडी चांगलीच हिट ठरली होती. दोघांचे जवळपास सगळेच सिनेमे हिट ठरले होते.3 / 12या सिनेमांमधी दोघांची केमिस्ट्री आणि डान्स लोकप्रिय ठरला होता. असे म्हणतात की, रूपेरी पडद्यावर रोमान्स करता करता दोघांचा रिअल लाइफमध्येही रोमान्स सुरू झाला होता. त्यावेळी दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती.4 / 12या प्रेमकहाणीत एक अडचण होती ती म्हणजे गोविंदा विवाहित होता. गोविंदा आणि नीलमच्या अफेअरची चर्चा जशीही मीडियात आली ही बातमी घरापर्यंत पोहोचली. मग काय गोविंदाच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं. गोविंदाच्या अफेअरने पत्नी तर नाराज झालीच त्याची आई सुद्धा नाराज झाली. त्यानंतर सुनीताने अट टाकली की, नीलमसोबत काम करायचं नाही.5 / 12गोविंदालाही प्रेम रोग झाला होता. तो काही ऐकायला तयार नव्हता. तो एकापाठी एक सिनेमे नीलमसोबत करत होता. जोडी हीट ठरल्याने अनेक निर्माते त्यांना सिनेमात घेण्यासाठी उत्सुक होते.6 / 12यादरम्यान हैराण झालेल्या सुनीताला गोविंदावर विश्वास होता की, तो तिच्यासोबत काही चूक करणार नाही. गोविंदाची पत्नी सुनीताने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'जेव्हा नीलमसोबत त्याच्या अफेअरची चर्चा होत होती तेव्हा मी निश्चिंत होते. मम्मी माझ्यासोबत होती आणि मला हे माहीत होतं की, चीची माझ्यासोबत काही चुकीच करणार नाही'.7 / 12गोविंदा आपल्या आईचं बोलणं कधी टाळत नाही. अशात गोविंदाला त्याच्या आईने स्पष्ट सांगितलं होतं की, नीलमपासून दूर रहा. परिवार आणि आईसाठी गोविंदाने नीलमची साथ सोडली. याचा परिणार नीलमच्या करिअरवर पडला. तिला सिनेमे मिळणं बंद झालं. मुख्य भूमिकांऐवजी तिला सहायक भूमिका मिळू लागल्या होत्या.8 / 12गोविंदासोबत ब्रेकअप झाल्यावर नीलमचं नाव बॉबी देओलसोबत जुळलं. बॉबीसोबत ब्रेकअपनंतर नीलम कोठारीने यूकेतील एक उद्योगपती ऋषी सेठियासोबत लग्न केलं. पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर नीलमने अभिनेता समीर सोनीसोबत २०११ मध्ये लग्न केलं. नीलमनंतर गोविंदाच्या आयुष्यात आणखी एक हिरोईन आली होती. ती दुसरी तिसरी कुणी नाही तर राणी मुखर्जी होती.9 / 12'हद कर दी आपने' सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. शूटींगदरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा होऊ लागली होती. असे सांगितले जाते की, दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. याचा प्रभाव त्याच्या मुलांवर पडत होता. त्याची मुलगी टीना डिप्रेशनमध्ये होती तर पत्नीने घर सोडलं होतं. परिवाराबाबत आपली जबाबदारी बघता गोविंदाने राणीची साथ सोडली.10 / 1211 / 1212 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications