Join us  

आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 3:30 PM

1 / 8
अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची घटना समोर आली आहे. स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी लागल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला. शस्त्रक्रिया करुन गोविंदाच्या पायातील गोळी काढण्यात आली असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.
2 / 8
पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गोविंदा हा इंडस्ट्रीतील एकमेव स्टार नाही, ज्याच्याकडे स्वतःच्या संरक्षणासाठी हत्यार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाप्रमाणेच इतरही अनेक सेलिब्रिटींना आत्मसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर/ पिस्तुल बाळगण्याची परवानगी देण्यात आली. अशाच सेलिब्रिटींबद्दल आज जाणून घेऊया…
3 / 8
यात प्रथम क्रमांक येतो तो म्हणजे बॉलिवूडचा दबंग खान. सलमान याच्याकडेही रिव्हॉल्वर ठेवण्यासाठी परवाना आहे. सलमान खानला देखील सतत जीवेमारण्याच्या धमक्या येत असतात. एवढंच काय तर त्याच्या घरावरही गोळीबार झालेला आहे. त्यामुळे भाईजानला आत्मसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे.
4 / 8
महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडेही शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे. त्यांच्याकडे आत्मसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर आहे. मुंबईत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमिताभ यांनी बिग बींनी बंदूक खरेदी केली होती. आपल्या एका ब्लॉगमधून त्यांनी ही माहिती शेअर केली होती.
5 / 8
बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांच्याकडेही शस्त्र परवाना आहे. सनी देखील आत्मसंरक्षणासाठी स्वतःकडे रिव्हॉल्व्हर ठेवतो. अभिनेत्याने 'सिंह साब द ग्रेट' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान देखील त्याच्या स्वतःच्या रिव्हॉल्वरचा वापर केला होता.
6 / 8
अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्याकडेही आत्मसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे. खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत ही माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव घरी शस्त्र ठेवते, सोबत घेऊन फिरत नाही, असे तिने सांगितले होते.
7 / 8
जनसत्ताने दिलेल्या रिपोर्टनुसार, अभिनेता रवी किशनकडेही बंदुकीचा परवाना आहे. त्याच्याकडे रायफल आणि रिव्हॉल्व्हर आहे.
8 / 8
अभिनेत्री सोहा अली खानकडेही बंदुकीचा परवाना होता. मात्र, काही वादांमुळे तिचा परवाना रद्द करण्यात आला.
टॅग्स :बॉलिवूडगोविंदासलमान खानअमिताभ बच्चनपुनम ढिल्लोसनी देओल