द ग्रेट 'खली'चा रोमँटीक डायलॉग, अक्षराने लाजून दिली दाद By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 10:28 PM1 / 9एखाद्या कार्यक्रमाला कुस्तीपटू आणि डब्लूडब्लूईचा द ग्रेट खलीची उपस्थिती म्हणजे चर्चेचा आणि लोकांच्या आवडीचा विषय बनतो. त्यातच, भोजपुरी स्टारसोबत खली झळकल्याने त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 2 / 9भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह सोशल मीडियावर चांगलीच एक्टीव्ह असते. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. 3 / 9 अक्षराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्टेजवर प्रमुख उपस्थिती असलेल्या खुर्चीत द ग्रेट खली दिसून येतो. तर, बाजुलाच माईक हातात घेऊन लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अक्षरा भाव खावून जाते. 4 / 9लाल रंगाच्या पँट, शर्ट आणि काळ्या कोटमध्ये खली खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तर, अक्षरानेही लाल रंगाच्या साडी-ड्रेसमध्ये अंकरींगचा माईक पडकला आहे. 5 / 9कॅप्शनची गरजच नाही, असे म्हणत अक्षराने व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अक्षरा एक भोजपुरी रोमँटीक डायलॉग बोलताना दिसते. त्यानंतर, हाच डायलॉग खलीने रिपीट केल्याचं पाहायला मिळत आहे. 6 / 9‘हम रऊआ सबसे बहुत प्यार करीला’ हा डायलॉग अक्षराने म्हटला असून त्यानंतर खलीनेही त्याच्या अंदाजमध्ये तो बोलला. खलीचा अंदाज पाहून अक्षरालाही हसू आवरेना. 7 / 9अक्षराला हसताना पाहून खलीलालही हसू आले. त्यावेळी, अक्षराने आप कितने प्यारे है... असे म्हणत खलीचं कौतुक करताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या अन् शिट्ट्यांनी दाद दिली. 8 / 9अक्षरा आणि खलीच्या या प्रेमळ जुगलबंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून खलीचे फॅन्स भन्नाट कमेंट करत आहेत. तर, अक्षरावरही बोललं जात आहे. 9 / 9अक्षराने भोजपुरी इंडस्ट्रीजची शान वाढवल्याचं फॅन्स सांगत आहेत, तर खलीने भोजपुरी डायलॉग म्हटल्यामुळे त्याचंही कौतुक करत दाद देत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications