हानिया, मावरा ते उसामा खान... पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 11:03 IST
1 / 10जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) बैसरन खोऱ्यात कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान २८ जण मारले (Tourists Killed In Pahalgam)गेले आहेत. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश जण पर्यटक आहेत. 2 / 10या दहशतवादी हल्ल्यानंतर सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी खदखद व्यक्त केली. केवळ बॉलिवूड स्टार्सच नाही तर अनेक पाकिस्तानी कलाकारांनीही (Pakistani celebrities Reacted On Pahalgam Terror Attack) शोक व्यक्त केला आहे. या पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात.3 / 10पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरनं दहशतवादी हल्ल्याबद्दल हळहळ व्यक्त करत पोस्ट शेअर (Hania Aamir Condemn Pahalgam Terror Attack) केली आहे. मानवतेला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, असं म्हणत तिनं या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. 4 / 10हानियानं लिहलं, 'कुठेही घडलेली दुर्घटना ही आपल्या सर्वांसाठी एक दुर्दैवी घटना असते. अलिकडच्या घटनेमध्ये मृत झालेल्या निष्पाप लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. आपण दुःखात आणि आशेवर एकरूप आहोत. जेव्हा निष्पाप लोक मरतात, तेव्हा फक्त त्यांनाच त्रास सहन करावा लागतो असं नाही, तर आपण सर्वजण दुःखी होतो. आपण कुठूनही आलो असलो तरी दुःखाची भाषा ही एकच असते. आपण नेहमीच मानवतेला इतर सर्व गोष्टींपेक्षा प्राधान्य दिलं पाहिजे, या शब्दात तिनं आपल्या भावना व्यक्त केल्यात.5 / 10फक्त हानिया आमिरचं नाही तर पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन (Mawra Hocane on Pahalgam Terror Attack) हिनं 'पीडित कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना... एखाद्याविरुद्धचा दहशतवादी हल्ला म्हणजे सर्वांविरुद्धचा दहशतवाद... जगात काय घडत आहे?', असं तिनं म्हटलं. 6 / 10अभिनेता उसामा खानने (Usama Khan on Pahalgam Terror Attack) ट्विट शेअर करत हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं. तो म्हणाला, 'पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना. या कठीण काळात त्यांना शक्ती मिळो. दहशतवाद निंदनीय आहे, तो कुठेही घडला तरी, मग पाकिस्तान असो, भारत असो किंवा इतर कुठेही. अशा निरर्थक हिंसाचाराच्या विरोधात उभे राहू', असं म्हणत त्याने हल्ल्याचा निषेध नोंदवला. 7 / 10अभिनेता फवाद खान यानेदेखील पोस्ट शेअर करत हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त (Fawad Khan Condemn Pahalgam Terror Attack ) केलं आहे. 'पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं. माझ्या प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत', असं त्यानं म्हटलं. 8 / 10यासोबतच पाक अभिनेता फरहान सईदनं ( (Farhan Saeed Condemn Pahalgam Terror Attack )) 'पहलगाम हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली दिली.9 / 10ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यापासूनचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर आता सरकारकडून पाकिस्तान विरोधात कडक पाऊले उचचली जात आहेत. या हल्ल्यातील तीन दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले. सध्या पाकिस्तान विरोधात लोकांमध्ये संतापाचे वातावरण असून दहशतवादाची किड मुळापासून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आलेत. 10 / 10२०१६ मध्ये झालेल्या 'उरी हल्ल्या'नंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांसाठी आपले दरवाजे बंद केले होते. बऱ्याच काळानंतर पाकिस्तानी स्टार्स पुन्हा काम करू लागले होते. पण, आता या हल्ल्यानंतर त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.