Hansika Motwani : तू मैत्रिणीच्याच संसारात विष कालवलं...? त्या आरोपावर हंसिका मोटवानी स्पष्टच बोलली... By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 5:40 PM1 / 11साऊथची लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीनं (Hansika Motwani) ४ डिसेंबर २०२२ रोजी सोहेल खतुरियासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची मोठी चर्चा झाली होती.2 / 11आता पुन्हा एकदा या लग्नाची चर्चा आहे. कारण काय तर हंसिका व सोहेलच्या लग्नाची कहाणी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली आहे.3 / 11या दरम्यान हंसिकाने अनेक खुलासे केले आहेत. हंसिकाने आपल्या मैत्रिणीचाच संसार मोडला, तिच्या संसारात विष कालवलं, असे अनेक आरोप तिच्यावर झालेत. आता तिने यावरही उत्तर दिलं आहे.4 / 11सोहेलचं हे दुसरं लग्न आहे. सोहेलचं पहिलं लग्न रिंकी बजाज नावाच्या मुलीशी झालं होतं आणि त्यांच्या लग्नात हंसिका नाचतानाही दिसली होती. 5 / 11नंतर सोहेल व रिंकी बजाज दोघांचा घटस्फोट झाला आणि पुढे हंसिकाने सोहेलशी लग्न केलं. हंसिकाने सोहेलशी लग्न करत असल्याची घोषणा केल्यानंतर तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.6 / 11हंसिकाने या ट्रोलिंगला आत्ता कुठे उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “लोकांसाठी माझ्याकडे बोट दाखवणे आणि मला व्हिलन ठरवणे खूप सोपं होतं. सेलिब्रेटी असण्याची मी ही किंमत मोजली.” 7 / 11“त्यावेळी मी त्या व्यक्तीला ओळखत होते, याचा अर्थ ती माझी चूक होती असं नाही. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही”, असंही ती म्हणाली. 8 / 11हंसिकाचा नवरा सोहेल यावर बोलला. तो म्हणाला,''हंसिकासोबत लग्न करण्याआधी माझं पहिलं एक लग्न झालं होतं. पण हंसिकामुळे माझं पहिलं लग्न मोडलं असं म्हटलं गेलं. ते खूपच चुकीचं आणि अर्थहीन होतं''.9 / 11तो म्हणाला, “माझं पहिलं लग्न २०१४ मध्ये झालं होतं आणि ते फार कमी काळ टिकलं. पण फक्त माझी व हंसिकाची मैत्री असल्यामुळे आणि केवळ ती माझ्या पहिल्या लग्नात उपस्थित असल्याचे फोटो पाहून तिला ट्रोल केलं गेलं.”10 / 11“ अचानक हंसिकाला माझं लग्न मोडण्यास जबाबदार ठरवणाऱ्या बातम्या पाहून मला धक्का बसला होता. कारण असं काहीही नव्हतं. हंसिकाचा यात काहीही रोल नव्हता,”असंही तो म्हणाला.11 / 11हंसिका मोटवानीच्या लग्नावर 'लव्ह शादी ड्रामा' नावाचा एक शो डिस्ने प्लस हॉट स्टारवर स्ट्रीम झाला आहे. याचा पहिला एपिसोड आज प्रदर्शित झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications