Join us

IN PICS : नोकरी न मिळाल्याने हताश झाला होता गोविंदा; ‘या’ एका प्रसंगाने बदलले आयुष्य

By रूपाली मुधोळकर | Published: December 21, 2020 11:35 AM

1 / 13
जबरदस्त कॉमिक टाइमिंग, तेवढाच जबरदस्त डान्स, दमदार अ‍ॅक्शन आणि रंगीबेरंगी चटकदार कपडे अशी 80 व 90 च्या दशकात गोविंदाची ओळख होती. याच गोविंदाचा आज वाढदिवस.
2 / 13
गोविंदाचे आयुष्य कुुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. दारिद्रय आणि ऐश्वर्य हे दोन्ही त्याने अनुभवले.
3 / 13
गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 मध्ये मुंबईत झाला. गोविंदाचे वडील अरूण कुमार आहुजा त्या काळातील गाजलेले अभिनेते होते. त्यांनी सुमारे 30 ते 40 सिनेमांत काम केले होते. आई शास्त्रीय गायिका होती. जी सिनेमात गायची.
4 / 13
एका चित्रपटाच्या निर्मितीत गोविंदाच्या वडीलांना प्रचंड तोटा सहन करावा लागला. तेव्हा त्यांना बंगला विकावा लागला होता. अलिशान बंगला सोडून ते विरारला राहायला आलेत. विरारच्या छोट्याशा घरातच गोविंदाचा जन्म झाला.
5 / 13
गोविंदा कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट होता. त्यामुळे नोकरीसाठी त्याने अनेकांच्या पाय-या झिजवल्या. नोकरीच्या शोधात असलेला गोविंदा मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू साठी गेला होता. त्यावेळी इंग्लिश न बोलता आल्यामुळे त्याला ती नोकरी मिळाली नव्हती. यामुळे गोविंदा अतिशय हताश झाला होता.
6 / 13
एकदा गोविंदाच्या आईला कुठेतरी जायचे होते. मुंबईच्या खार स्टेशनवर गोविंदा व त्याची आई लोकलची प्रतीक्षा करत होते. पण लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. इतकी गर्दी की, गोविंदाने अनेक लोकल सोडल्या. इतक्यात रेल्वे स्टेशनवर त्याला एक नातेवाईक भेटला. गोविंदाने त्याच्याकडून पैसे उधार घेऊन आईला फर्स्ट क्लासचा पास काढून दिला. या घटनेचा गोविंदाच्या मनावर इतका परिणाम झाला की, सगळे काही विसरून त्याने कामात स्वत:ला झोकून घेतले.
7 / 13
80 च्या दशकात सर्वप्रथम एलविन नावाच्या कंपनीची एक जाहिरात त्याला मिळाली आणि यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
8 / 13
1986 साली प्रदर्शित झालेल्या इल्जाम या चित्रपटातून त्याच्या फिल्म करिअरला सुरुवात झाली. पुढे तो एकापाठोपाठ एक सिनेमे करत सुटला.
9 / 13
कुली नंबर 1, राजा बाबू, अखियोसें गोली मारे, हिरो नंबर 1, दुल्हे राजा, शोला और शबनम, साजन चलें ससुराल, जोडी नंबर 1, हसीना मान जाएगी अशा अनेक सुपरहिट चित्रपट गोविंदाने गाजवले. कुली नंबर 1, राजा बाबू, अखियोसें गोली मारे, हिरो नंबर 1, दुल्हे राजा, शोला और शबनम, साजन चलें ससुराल, जोडी नंबर 1, हसीना मान जाएगी अशा अनेक चित्रपट गोविंदाने गाजवले.
10 / 13
गोविंदाचा डान्स अन् त्याचे डायलॉग म्हणजे अफलातून. या दोन गोष्टींनी गोविंदा लोकप्रिय झाला. तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला. आजही गोविंदाचे चाहते त्याला विसरलेले नाहीत, ते म्हणूनच.
11 / 13
एकेकाळी गोविंदाच्या चित्रपटांची प्रचंड चर्चा होती. पण चित्रपटांमुळेच नाही तर पर्सनल लाईफमुळेही तो सतत चर्चेत असे. होय, अनेक अभिनेत्रींसोबत गोविंदाचे नाव जोडले गेले. यातल्या एका प्रेमप्रकरणाची प्रचंड चर्चा झाली. ती म्हणजे, गोविंदा व नीलमच्या प्रेमप्रकरणाची.
12 / 13
गोविंदा व नीलमने 10 चित्रपट एकत्र केलेत. यापैकी 6 सिनेमे सुपरहिट झालेत. यादरम्यान गोविंदा नीलमसाठी अक्षरश: वेडा झाला होता. खरे तर पहिल्याच भेटीत तो तिच्यावर भाळला होता. पुढे तो तिच्यात गुंतत गेला अगदी सुनीताशी लग्न ठरले असतानाही. होय,11 मार्च 1987 ला गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले. सुनीता आणि गोविंदा यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. पण लग्न व्हायच्या काही वर्षं आधी गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता. एकीकडे सुनीता आणि दुसरीकडे नीलम अशी त्याची अवस्था झाली होती.
13 / 13
त्या काळात नीलमशिवाय गोविंदाच्या मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता अगदी होणा-या पत्नीसमोर म्हणजेच सुनीतासमोर तो नीलमची प्रशंसा करताना थकत नसे. एवढेच नाही तर तू सुद्धा नीलमसारखी बन, असेही तो सुनीताला म्हणायला. सुनीता यावर प्रचंड चिडायची.
टॅग्स :गोविंदा