Join us

ऐश्वर्या राय बच्चनचे Unseen Photos पाहिलेत का?, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 5:05 PM

1 / 10
१९ नोव्हेंबर, १९९४ ही तारीख ऐश्वर्या रायसाठी खूप महत्त्वाची आहे. ही तारीख आहे जेव्हा तिला मिस वर्ल्डचा किताब मिळाला होता. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
2 / 10
निळ्या डोळ्यांची ऐश्वर्या राय हे विजेतेपद जिंकून भारतात परतली तेव्हा तिची चौफेर चर्चा झाली. त्या काळात तिच्या सौंदर्याची चर्चा जगभर झाली होती. आज आम्ही तुम्हाला त्यावेळचे काही न पाहिलेले फोटो दाखवत आहोत, जे पाहून तुम्ही देखील मंत्रमुग्ध व्हाल.
3 / 10
ऐश्वर्या रायने कॉलेजच्या काळात जाहिरातींमध्ये काम करायला सुरुवात केली होती. तिने लहान वयातच ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला होता.
4 / 10
मॉडेलिंग करताना तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि १९९४ मध्ये ती मिस वर्ल्ड बनली.
5 / 10
यानंतर ऐश्वर्याला अभिनयाच्या ऑफर्स येऊ लागल्या.
6 / 10
१९९७ मध्ये मणिरत्नमच्या इरुवर या तमिळ चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली.
7 / 10
अभिनेत्रीच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव होते 'और प्यार हो गया'.
8 / 10
तिचा पहिला यशस्वी व्यावसायिक तमीळ चित्रपट जीन्स होता.
9 / 10
ऐश्वर्या राय बच्चन हम दिल दे चुके सनम आणि देवदास चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखली जाते. या दोन्ही चित्रपटातील तिच्या कामाची सर्वत्र खूप प्रशंसा झाली होती.
10 / 10
ऐश्वर्या सध्या सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रीय नाही. मात्र आजही तिच्या सौंदर्याची चर्चा होताना दिसते.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन