साउथ स्टार सूर्याच्या पत्नीला पाहिलंत का?, तीदेखील आहे अभिनेत्री, वाचा त्यांची लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 4:06 PM1 / 8साउथचा सुपरस्टार अभिनेता सूर्या हा प्रसिद्ध अभिनेता शिवकुमार यांचा लेक. मात्र तरीही सूर्याने मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. 'जय भीम', 'सिंघम', 'गजिनी', 'एनजीके' सारखे सुपरहिट चित्रपट सूर्याने गाजवले आहेत. आज देशभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. 'सोरारई पोट्रु' सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.2 / 8सुर्या दक्षिणेतील सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे. या यशाचे श्रेय सुर्या त्याची पत्नी ज्योतिकाला देतो. पण तुम्हाला माहीत आहे का सुर्याची पत्नी ज्योतिका कोण आहे? तुम्हाला हे जाणून आनंद होईल की सूर्याची पत्नी ज्योतिका हीदेखील अभिनेत्री आहे. पती सूर्याप्रमाणेच ती साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.3 / 8विशेष बाब म्हणजे ज्योतिका अभिनयाच्या बाबतीत पती सूर्यापेक्षा कमी नाही. ज्योतिका ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती आहे. 'सोरारई पोट्रु' या चित्रपटासाठी सुर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच चित्रपटाच्या निर्मितीसाठी ज्योतिकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.4 / 8सुर्या आणि ज्योतिकाची प्रेमकहाणी खूपच फिल्मी आहे. चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले. नेरुक्कू नेर या चित्रपटातून सुर्याने वयाच्या 22 व्या वर्षात पदार्पण केले. हा चित्रपट चालला नाही. 1999 मध्ये सूर्याची ज्योतिकाशी भेट झाली. पूवेल्लम केट्टुपर या चित्रपटाच्या सेटवर ते पहिल्यांदा भेटले होते. ज्योतिका ही मुंबईतील पंजाबी कुटुंबातील असून सुर्या तमिळ आहे.5 / 8त्यावेळी सूर्या आणि ज्योतिका दोघेही स्ट्रगलिंग कलाकार होते आणि आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत होते. ज्योतिकाला तमिळ भाषा येत नव्हती, तरीही ज्योतिकाने तमिळ इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी खूप मेहनत घेतली. ज्योतिकाचे तिच्या कामाबद्दलचे समर्पण पाहून सूर्याला आश्चर्य वाटले. ज्योतिकाचे कामाबद्दलचे समर्पण आणि नम्र स्वभाव पाहून सूर्य प्रभावित झाला.6 / 8ज्योतिका आणि सूर्याची दुसरी भेट २००१ मध्ये झाली होती. यानंतर दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली. मग चांगले मित्र झाले. सूर्याने ज्योतिकाची त्याच्या जवळच्या मित्रांशी ओळख करून दिली. दोघेही पार्ट्यांमध्ये एकत्र दिसू लागले. काखा काखा या चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले. यानंतर दोघांचे नाते पुढे वाढत गेले आणि त्यांनी लग्न केले.7 / 8११ सप्टेंबर २००६ रोजी सुर्या आणि ज्योतिका यांचे लग्न झाले. दोघांची ऑनस्क्रीन जोडी ७ चित्रपटांमध्ये झळकली आहे. यामध्ये पूवेल्लम केतुप्पर, उइरिले कलंथाथु, काखा काखा, पेराझगन, मायावी, जून आर आणि सिल्लुनू ओरु काधल यांचा समावेश आहे.8 / 8सूर्या आणि ज्योतिकाला दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. सूर्या आणि ज्योतिका यांच्या लग्नाला १६ वर्षे झाली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications