Join us

रणवीर सिंग ते हेलन! तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींची खरी आडनावं माहितीयेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 7:00 AM

1 / 10
कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अनेक कलाकार निरनिराळे फंडे वापरत असतात. यात कोणी आपला लूक चेंज करतं, कोणी नाव बदलतं तर कोणी चक्क आडनावचं लावत नाही. म्हणूनच, बॉलिवूडमधील आडनाव न लावणारे कलाकार कोणते ते जाणून घेऊयात.
2 / 10
शान- आपल्या आवाजाने कानसेनांना तृप्त करणारा गायक म्हणजे शान. या प्रसिद्ध गायकाचं खरं नाव शान मुखर्जी असं आहे.
3 / 10
रेखा - आजही आपल्या सौंदर्यामुळे अनेकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखाचं खरं नाव भानुरेखा गणेशन असं आहे.
4 / 10
असीन - दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे असीन. गजनी आणि रेडी या चित्रपटांमध्येही तिने काम केलं. तिचं खरं नाव असीन थोटुमकल असं आहे.
5 / 10
हेलन - प्रसिद्ध अभिनेत्री आणि सलमान खानची सावत्र आई हेलन यांचं पूर्ण नाव हेलन अँन रिचर्डसन असं आहे.
6 / 10
काजोल - गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे काजोलने विशेष लोकप्रियता मिळवलं. तिचं खरं नाव काजोल मुखर्जी असं आहे. परंतु, कलाविश्वात येण्यापूर्वी तिने आडनाव लावणं बंद केलं.
7 / 10
अक्षय कुमार - बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार याचं खरं नाव राजीव हरी ओम भाटिया असं आहे.
8 / 10
रणवीर सिंग- अल्पावधीत तरुणाईच्या गळ्यातलं ताईत झालेला अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. उत्तम अभिनयकौशल्य आणि हटके स्टाइल यासाठी रणवीर कायम चर्चेत असतो. रणवीर कलाविश्वात रणवीर सिंग या नावाने ओळखत असला तरीदेखील त्याचं पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी असं आहे.
9 / 10
गोविंदा - बॉलिवूडमधील उत्तम डान्सर आणि अभिनेता म्हणजे गोविंदा. हा अभिनेता चीची या नावानेही ओळखला जातो. मात्र, त्याचं खरं नाव गोविंद अरुण आहुजा असं आहे.
10 / 10
श्रीदेवी - बॉलिवूडची चांदणी म्हणून ओळख मिळालेल्या श्रीदेवीचं निधन होऊन बराच काळ लोटला. मात्र, तिची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. श्रीदेवीचं खरं नाव श्री अम्मा यांगरी अय्यपन असं आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीरणवीर सिंगहेलनगोविंदाअक्षय कुमारकाजोलरेखा