कोरोनामध्ये नर्स बनून लोकांची केली मदत, ब्रेनस्ट्रोक-पॅरेलिसिसची झाली शिकार; किंग खानची अभिनेत्री करतेय कमबॅक By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:24 AM1 / 8कोरोनाच्या काळात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या महामारीत लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यातून बाहेर कसे पडायचे हे लोकांना समजत नव्हते. यादरम्यान अनेकांनी मसिहा बनून मदतीचा हात पुढे केला. शिखा मल्होत्राही त्यापैकीच एक होती.2 / 8शिखाने शाहरुख खानच्या फॅन या चित्रपटात काम केले होते. पण गरज पडली तेव्हा तिने कोरोनाच्या काळात नर्स बनून लोकांना खूप मदत केली. कालांतराने तिलादेखील अनेक आजारांनी ग्रासलं. मात्र, आता या आजाराशी लढा देऊन शिखानं पुनरागमन केले. 3 / 8अभिनेत्री होण्यापूर्वी शिखाने नर्सिंगचे शिक्षण घेतले होते. त्यानंतरच त्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला. तिने पहिल्यांदा शाहरुख खानच्या फॅन या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. त्यानंतर २०२० मध्ये आलेल्या कंचली या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.4 / 8शिखाच्या डेब्यूसोबतच कोरोनाचे आगमन झाले होते, त्यानंतर तिने लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. तिने बीएमसी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायला सुरुवात केली.5 / 8शिखा यांनी सुमारे वर्षभर जनतेची सेवा केली. यानंतर ती स्वतः कोरोनाच्या विळख्यात आली. 6 / 8कोरोनातून बरे होत असताना शिखाला ब्रेनस्ट्रोक आला. त्यानंतर ती अर्धांगवायूची शिकार झाली. अशा परिस्थितीत शिखा एकाच वेळी अनेक आजारांशी लढत होती. औषधांमुळे तिचे वजनही खूप वाढले होते पण तिने हार मानली नाही.7 / 8शिखाला अनेक आजारांनी घेरले होते. अशा परिस्थितीत तिच्या तब्येत सुधारण्यासाठी बराच वेळ जात होता पण तिने हार मानली नाही. ती बरी झाली आणि आता ती पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतली आहे.8 / 8 शिखाच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तिचे फोटो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications