Join us

'कोणी तरी माझा गळा दाबतंय'; 'त्या' बंगल्यात रात्रीच्या वेळी हेमा मालिनींना यायचे विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 7:38 AM

1 / 9
बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी यांचे आज लाखो चाहते आहेत. गेल्या कित्येक दशकांपासून त्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं आहे.
2 / 9
हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक रंजक फिल्मी किस्से आहेत. परंतु, सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या खऱ्या आयुष्यात घडलेली घटना चर्चेत येत आहे.
3 / 9
एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या खासगी आयुष्यात आलेला भयानक अनुभव सांगितला.
4 / 9
हेमा मालिनी यांनी सपनों का सौदागर या सिनेमातून त्यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यासाठी त्या चेन्नई सोडून मुंबईत आल्या होत्या.
5 / 9
मुंबईत त्या आल्यानंतर त्यांना एका विचित्र प्रकाराला सामोरं जावं लागलं. त्या ज्या घरात राहत होत्या तिथे त्यांना वाईट अनुभव येऊ लागले. २०१८ मध्ये त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं.
6 / 9
हेमा मालिनी मुंबईत आल्यानंतर वांद्रे येथील मनावेंद्र अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासोबत रहात होत्या. परंतु, हे घर लहान असल्यामुळे त्या काही दिवसांमध्येच एका बंगल्यात शिफ्ट झाल्या.
7 / 9
हेमा मालिनी जुहूतील एका बंगल्यामध्ये रहायला आल्या. परंतु,या घरात त्यांना भयंकर अनुभव आले.
8 / 9
त्या बंगल्यात मला सतत असं वाटायचं की कोणी माझा गळा दाबतंय. त्यामुळे मला श्वास घ्यायलाही त्रास व्हायचा. मला त्यावेळी इतकी भीती वाटायची की मी आईजवळ झोपू लागले. पण, तरी त्या गोष्टी माझ्यासोबत घडायच्या, असं त्यांनी सांगितलं.
9 / 9
दरम्यान, या घटनांना कंटाळून मी तो बंगला सोडला आणि पुन्हा एक नवीन फ्लॅट खरेदी केला. जुहूमधील ते घर सोडल्यानंतर मला रात्री चांगली झोप लागायला लागली.
टॅग्स :हेमा मालिनीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा