Join us

Ahana Deol: खूप सुंदर आहे हेमा मालिनींची धाकटी लेक अहाना, दोन हँडसम अभिनेत्यांना केलंय डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 2:18 PM

1 / 10
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे बॉलिवूडमधील मोस्ट रोमँटिक कपल म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या प्रेमाची नेहमीच मिसाल दिली जाते. दोघांना ईशा (Esha Deol)आणि अहाना (Ahana Deol) दोन सुंदर मुली आहेत. दोन्ही मुलींवर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा खूप जीव आहे.
2 / 10
ईशा देओल सध्या तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. भरत तख्तानीसोबत तिचा 12 वर्षांचा संसार मोडला आहे. ईशा आणि भरतला राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. आईप्रमाणेच ईशाही बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होती. मात्र फ्लॉप करिअरनंतर तिने लग्न केलं आणि ती स्क्रीनवरुन गायब झाली.
3 / 10
हेमा मालिनी यांच्या धाकट्या लेकीबद्दल खूप कमी जणांना माहित आहे. अहाना देओल ईशा पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. अहाना सुद्धा आई आणि बहिणीप्रमाणेच खूप सुंदर दिसते. अहानाच्या करिअर आणि लव्हलाईफबद्दल जाणून घेऊया.
4 / 10
2002 साली अहाना पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली. बहिणीच्याच 'ना तुम जानो ना हम' सिनेमात तिने छोटी भूमिका साकारली. यामध्ये ती ईशाची बेस्ट फ्रेंड होती. या सिनेमानंतर मात्र अहानाने पुन्हा अभिनय केला नाही. कारण तिची ओढ शास्त्रीय नृत्याकडे होती.
5 / 10
अहानाने हेमा मालिनी यांच्याकडूनच नृत्याचं शिक्षण घेतलं. आईसोबत तिने अनेक शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम केले. आईप्रमाणेच अहानाही उत्तम क्लासिकल डान्सर आहे.
6 / 10
अहानाचं शिक्षण मुंबईतच झालं. कॉलेजच्या दिवसात अहाना आणि रणवीर सिंह एकमेकांना डेट करत होते हे खूप कमी जणांना माहित असेल. होय रणवीर आणि अहाना एकाच कॉलेजमध्ये होते. त्यांच्यात आधी चांगली मैत्री होती. नंतर ते एकमेकांना डेट करायला लागले.
7 / 10
मात्र नंतर अहानाची ओळख एका उंच, गुड लुकिंग मुलाशी झाली. तिने त्या मुलासाठी रणवीर सिंहशी नातं तोडलं. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द अभिनेता आदित्य रॉय कपूर होता. तेव्हा आदित्यही त्याच कॉलेजमध्ये होता आणि त्याला व्हीजे बनायचं होतं. रणवीर मात्र नंतर खूप निराश झाला आणि कॉलेज सोडून अमेरिकेला शिकण्यासाठी गेला.
8 / 10
इकडे अहाना आणि आदित्य 4 वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र आदित्य अहानाला वेळ देत नसल्याने त्यांच्यात दुरावा आला. अहानामुळे आदित्यला स्वत:च्या करिअरकडे लक्ष देता येत नव्हतं. कालांतराने त्यांचं नातं तुटलं.
9 / 10
काही वर्षांनी २०१२ साली बहीण ईशा देओलच्या लग्नात अहानाची ओळख उद्योगपती वैभव वोहराशी झाली. दोघंही एकमेकांना पाहताच प्रेमात पडले. तेव्हा वैभव एका प्रसिद्ध कंपनीचा संचालक होता. तर आता तो इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्समध्ये लॉजिस्टिक्स आणि समुद्र समितीचा अध्यक्ष आहे.
10 / 10
अहाना आणि वैभवने दोन वर्ष एकमेकांना डेट केलं आणि नंतर 2014 साली ते लग्नबंधनात अडकले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी खूपच थाटात त्यांचं लग्न लावलं होतं. अहानाने 2015 साली डॅरियन या मुलाला जन्म दिला. तर 2020 साली तिला जुळ्या मुली झाल्या. अदिया आणि अॅस्ट्रिया अशी त्यांची नावं आहेत.
टॅग्स :हेमा मालिनीइशा देओलबॉलिवूडपरिवारधमेंद्र