Join us

तुझी खूप आठवण येते अम्मा..., आईच्या आठवणीनं भावुक झाल्या हेमा मालिनी, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 11:13 AM

1 / 9
निखळ सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारी ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांनी एक काळ गाजवला. ‘ड्रीमगर्ल’चा सिनेमा लागला की, लोकांच्या उड्या पडायचा. हेमा याचं सगळं श्रेय आपल्या आईला देतात.
2 / 9
मी आज जे काही आहे, ते आईमुळे, असं आजही त्या सांगतात. हेमा मालिनी यांच्या आई जया चक्रवर्ती निर्मात्या आणि कॉस्च्युम डिझाईनर होत्या. लेकीचं करिअर घडवण्यासाठी, तिला नृत्याची आवड लावण्यासाठी या आईनं अथक परिश्रम घेतले.
3 / 9
हेमा यांची आई आज या जगात नाही. काल 3 जानेवारीला त्यांचा वाढदिवस होता. साहजिकच आईच्या आठवणीनं हेमा भावुक झाल्या. आईसोबतचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
4 / 9
अम्मा आमच्या कुटुंबाची प्रमुख होती. मातृसत्ताक पद्धतीने आमचं घरं सांभाळलं. सर्व मुलांवर तिची समान माया होती. मुंल तिला अम्बा म्हणतं, तिच वाढदिवस खूपच मजेदार असायचा, असं म्हणत हेमांनी आईच्या वाढदिवसाचे काही जुने फोटो शेअर केलेत.
5 / 9
दिवस कसे भरकन सरतात. जणू कालचीच गोष्ट आहे, असं वाटतं. मी अम्मासोबत शूटींगची डेट ठरवण्यात बिझी होते. दिवसाला 3 शिफ्टमध्ये काम करत होते. आज मी इथे आहे, पण ती नाही. आयुष्य चालत राहतं. पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आठवणी राहतात, असंही हेमा यांनी लिहिलं आहे.
6 / 9
माझी आई आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत राहिली. माझ्यामागे खंबीरपणे उभी राहिली. एक अभिनेत्री व क्लासिकल डान्सर म्हणून तिने माझ्या करिअरला नेहमी सपोर्ट केला. माझ्यावर आलेलं प्रत्येक संकट तिने परतवून लावलं, असंही एका पोस्टमध्ये हेमा यांनी लिहिलं आहे.
7 / 9
आज मला आईची खूप आठवण येतेय. आजही ती वरून मला मार्गदर्शन करते. ती आमच्या कुटुंबाची शक्ती होती. एक पॉवर हाऊस, जिचा इंडस्ट्रीत सर्वजण आदर करतं. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझी खूप आठवण येते अम्मा..., असं लिहित हेमांनी आईसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
8 / 9
हेमा यांचं करिअर घडवण्यात त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. जया चक्रवर्ती स्वत: क्लासिकल डान्सर होत्या. हेमा यांनाही त्यांनी क्लासिकल डान्स शिकवला.
9 / 9
हेमा जेव्हा केव्हा शूटींगला जात तेव्हा न चुकता त्यांचा डान्स टीचर त्यांच्यासोबत असायचा. नृत्यात खंड पडता कामा नये, असा हेमा यांच्या आईचा आग्रह असायचा.
टॅग्स :हेमा मालिनीबॉलिवूड