वय वर्ष ६३ तरीही सुनील शेट्टींचा कमालीचा फिटनेस तरुणाईला देतोय प्रेरणा! काय आहे तंदुरुस्तीचं रहस्य? By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 4:35 PM1 / 7सुनील शेट्टी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. कॉमेडी असो वा गंभीर भूमिका सुनील शेट्टीने कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशा भूमिका केल्यात2 / 7सुनील शेट्टीचे आज सोशल मीडियावर खास फोटो व्हायरल झालेत. यात सुनील शेट्टी बाथरुममध्ये शॉवरने अंघोळ करताना दिसत असून अण्णाच्या या फोटोंना प्रेक्षकांची पसंती मिळालीय3 / 7मी माझं वय धुवून काढतोय, असं सुनील शेट्टीने या फोटोंना कॅप्शन दिलंय. वयाच्या ६३ व्या वर्षी सुनील शेट्टीचा हा कमालीचा फिटनेस सर्वांना थक्क करुन सोडतोय4 / 7सुनील शेट्टीच्या या कमालीचं फिटनेसचं रहस्य म्हणजे अभिनेता रात्री ९-१० वाजता झोपतो. त्यानंतर सकाळी ५ किंवा ६ वाजता तो उठतो.5 / 7उठल्यानंतर सुनील शेट्टी प्राणायाम आणि योगासनांकडे लक्ष देतो. नंतर ४० - ४५ मिनिटं सुनील शेट्टी व्यायाय करतो.6 / 7सुनील शेट्टी त्याच्या आहारात सफेद भात, साखर, ब्रेड हे पदार्थ वर्ज्य करुन फ्रेश पालेभाज्या आणि इतर पदार्थांचा समावेश करतो7 / 7सुनील शेट्टी लवकरच हेरा फेरी ३, वेलकम टू जंगल या सिनेमांमध्ये आणि धारावी बँक या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे आणखी वाचा Subscribe to Notifications