Natural Beauty : या आहेत बॉलिवूडच्या खऱ्या सौंदर्यवती, कधीच केली नाही प्लास्टिक सर्जरी By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 5:03 PM1 / 12माधुरी दीक्षित हिला सुरूवातीचा काळात अनेकदा नकार पचवावे लागलेत. किरकोळ दिसते म्हणून तिला हिणवलं गेलं. पण माधुरी आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. तिने कधीच कुठल्या सर्जरीची मदत घेतली नाही. आपल्या सौंदर्यानं तिने सर्वांनाच वेड लावलं.2 / 12ऐश्वर्या रायच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहे. जगातील सर्वाधिक सुंदर महिलांमध्ये तिचा समावेश होते. तिने कधीच सौंदर्य वाढवण्याच्या नादापायी सर्जरीचा पर्याय स्वीकारला नाही.3 / 12दीपिका पादुकोण ही सुद्धा बॉलिवूडची खरी सौंदर्यवती आहे. तिला सुरूवातीला बूब जॉब करण्याचा सल्ला मिळाला. पण दीपिकाने कधीच असले सल्ले मनावर घेतले नाही. ती आहे तशीच राहिली आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली.4 / 12आलिया भट हिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. आलियाला कधीच कुठल्या सर्जरीची गरज भासली नाही. तिची नॅचरल ब्युटी आणि दमदार अभिनय पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले.5 / 12विद्या बालन हिनेही कधीच प्लास्टिक सर्जरीसारख्या कुठल्या सर्जरीला कधी भीक घातली नाही. तरिही आज ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.6 / 12जॅकलिन फर्नांडिस हिला कधीच कुठल्या सर्जरीची मदत घ्यावी लागली नाही. तिला गरजच भासली नाही. आपल्या नैसर्गिक सौंदर्यानं तिने सगळ्यांना वेड लावलं.7 / 12सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये येण्याआधी आपलं कित्येक किलो वजन घटवलं. पण तिने आणखी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा पर्याय स्वीकारला नाही.8 / 12सोनम कपूरला तिच्या स्माईलमुळे अनेकदा ट्रोल केलं जातं. पण सोनम कपूरने ही टीका कधीच मनावर घेतली नाही. फॅशनच्या दुनियेत आयकॉन्स मानली जाणारी सोनमही प्लास्टिक सर्जरीपासून दूर राहिली.9 / 12इलियाना डिक्रूज ही साऊथमधून आलेली बाला बॉलिवूडमध्ये तुफान लोकप्रिय झाली. तिने कधीच कोणत्या सर्जरीची मदत घेतली नाही.10 / 12यामी गौतम ही बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री. तिनेही कधीच सुंदर दिसण्याच्या नादात कृत्रिम उपाय केले नाहीत. तिच्या अभिनयाच्या जोरावरच ती इथपर्यंत पोहोचली.11 / 12श्रद्धा कपूर मुळातच सुंदर आहे. तिनेही कधीच प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली नाही. म्हणूनच बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या गर्दीत ती वेगळी ठरली.12 / 12प्रियंका चोप्रानं प्लास्टिक सर्जरी केली. पण तिची चुलत बहिण परिणीती चोप्रा हिने कधीही कुठल्या सर्जरीचा पर्याय स्वीकारला नाही. ती आहे तशीच राहिली. आणखी वाचा Subscribe to Notifications