Join us

सानिया-शोएबचा झाला घटस्फोट; पोटगी म्हणून किती रक्कम देणार माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 1:29 PM

1 / 10
सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा खेळाडू शोएब मलिक आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
2 / 10
भारताचा जावई झालेल्या शोएबने सानिया मिर्झापासून काडीमोड घेतला आहे. सानिया आणि शोएब यांचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे.
3 / 10
सानियाला घटस्फोट दिल्यानंतर शोएबने सना जावेद हिच्यासोबत निकाह केला. शोएबचा हा तिसरा निकाह आहे.
4 / 10
शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटामुळे सगळ्यांनाच धक्का बदला असून सध्या सोशल मीडियावर या जोडीची चर्चा रंगली आहे.
5 / 10
या दोघांचा घटस्फोट कसा झाला, घटस्फोटानंतर शोएब सानियाला किती पोटगी देणार यांसारखे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
6 / 10
सानियाला शोएबकडून किती पोटगी मिळेल हा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे. कारण, शोएबने त्याची पहिली पत्नी आयशा सिद्दीकी किला घटस्फोट दिल्यानंतर तिला मोठी रक्कम पोटगी म्हणून दिली होती.
7 / 10
शोएबने २०१० मध्ये सानियासोबत लग्न केलं. त्यापूर्वी त्याने आयशाला घटस्फोट दिला होता. यावेळी त्याने तिला १५ कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते.
8 / 10
२०१० मध्ये शोएबने आयशाला १५ कोटींची पोटगी दिली होती. त्यामुळे सानियाला आता तो किती पोटगी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
9 / 10
रिपोर्टनुसार, शोएबची एकूण संपत्ती २८ मिलियन डॉलर म्हणजेच २३० कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे या संपत्तीमधील तो किती टक्के वाटा सानियाला देणार हा प्रश्न आहे.
10 / 10
शोएब सानियाला नेमकी किती रक्क पोटगी म्हणून देणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. मात्र, ही रक्कम नक्कीच मोठी असेल असंही म्हटलं जात आहे.
टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकसेलिब्रिटी