अभिनेत्याचा १४ वर्षांचा संसार मोडला; आता 12 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:05 PM1 / 7बॉलिवूडमध्ये लग्न, घटस्फोट या अगदी सामान्य गोष्टी आहेत. अनेक जोडप्यांनी त्यांचे १० -१५ वर्षांता संसार मोडला आहे. तर काही त्यांच्यापेक्षा १०-२० वर्षांनी लहान पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.2 / 7'ग्रीक गॉड' म्हणून ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचंही वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. हृतिक सध्या अभिनेत्री सबा आजादला डेट करत आहे.3 / 7काही दिवसांपासून हृतिक आणि सबा आजादच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या होत्या. पण याला पूर्णविराम देत काल दोघंही हातात हात घालून मूव्ही स्क्रीनिंगसाठी पोहोचले.4 / 7हृतिक रोशनने 2000 साली सुझैन खानसोबत लग्न केलं होतं. हे लव्ह मॅरेज होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. मात्र लग्नानंतर तब्बल १४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. 5 / 7घटस्फोटानंतर काही दिवसातच हृतिक सबासोबत रिलेशनशिपमध्ये आला. तर सुझैन खान अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आली. त्यामुळे दोघंही चांगलेच ट्रोल झाले.6 / 7सबा आजाद हृतिकपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. अनेकदा तिला हृतिकच्या कुटुंबासोबतही वेळ घालवताना बघितले गेले आहे. तसंच दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्याही चर्चा आहेत. 7 / 7हृतिक आगामी 'वॉर 2' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे हृतिकसोबत डेटिंग करत असल्याने सबा आजादच्या हातून तिचं व्हॉइस ओवरचं काम केलं गेलंय. याविरोधात तिने सोशल मीडियावर आवाज उठवला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications