Join us

Ramayan चं बजेट पाहून डोळे दिपतील! हृतिक-रणबीरला मिळणार प्रत्येकी ७५ कोटी?, कोण कोणत्या भूमिकेत? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 8:47 PM

1 / 9
Ramayan Cast and Budget: बॉलीवूड अभिनेते हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील आजवरची सर्वात शानदार भूमिका सादर करण्याचं शिवधनुष्य उचलण्यास सज्ज झाले आहेत.
2 / 9
हृतिक, रणबीर दोघं राम आणि रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या बहुचर्चित 'रामायण' (Ramayan) चित्रपटात हृतिक आणि रणबीर यांच्या कास्टिंगवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
3 / 9
सुत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाचं बजेट तब्बल ७५० कोटी रुपये इतकं असणार आहे. तर हृतिक आणि रणबीर यांना या चित्रपटासाठी देण्यात आलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा मनोरंजन विश्वात सुरू आहे.
4 / 9
'रामायण' पडद्यावर साकारण्याची कामगिरी आजवर अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या वेगवेगळ्या अंदाजात सादर केलेली आपण पाहिली आहे. पण कुणालाही रामानंद सागर यांनी साकारलेल्या 'रामायण'ला मिळालेलं यश आजवर कुणालाच प्राप्त करता आलेलं नाही.
5 / 9
रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका डीडी नॅशनलवर प्रकाशित झाली होती. या मालिकेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता की लॉकडाऊनमध्येही 'डीडी'नं रामायण मालिकेच्या पुर्नप्रसारणाचा निर्णय घेतला होता.
6 / 9
'रामायण' मोठ्या पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य 'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी उचलणार आहेत.
7 / 9
हृतिक, रणबीरला किती मिळालं मानधन? बॉलीवूड हंगामानं दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या प्रोडक्शनशी निगडीत सुत्रांनी हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांना प्रत्येकी ७५ कोटी रुपयांचं मानधन दिलं जाणार असल्याची माहिती दिली आहे.
8 / 9
नितेश तिवारी आणि त्यांची टीम सध्या सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहे. करिना कपूरला सीतेच्या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती असं सांगितलं गेलं होतं. पण सुत्रांच्या माहितीनुसार त्यात कोणतंही तथ्य नव्हतं.
9 / 9
दरम्यान, अभिनेता सैफ अली खान दिग्दर्शक ओम राऊतच्या 'आदिपुरुष' चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. यात रामाची भूमिका 'बाहुबली' फेम प्रभास साकारणार आहे. नुकतंच चित्रपटाचं चित्रीकरण देखील पूर्ण झालं आहे.
टॅग्स :रामायणहृतिक रोशनरणबीर कपूर