Join us

'माझे सात बॉयफ्रेंड आहेत आणि…', अफेअर्सच्या चर्चांवर श्वेता तिवारीची लेक पलकनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 5:24 PM

1 / 8
अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
2 / 8
चित्रपटाव्यतिरिक्त पलक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ती सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमला डेट करत असल्याचे बोलले जात होते. आता पलकने अफेअर्सच्या सतत होणाऱ्या चर्चांबाबत भाष्य केले.
3 / 8
इब्राहिमला डेट करण्याच्या चर्चांवर पलकने बोलणे याआधी टाळले होते. फक्त कामावर लक्ष केंद्रित करत आहे, सांगितले होते. आता सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत.
4 / 8
किसी का भाई किसी की जान’च्या ट्रेलर लाँचदरम्यान लोकांना असं वाटलं की, सलमान खानने तुझ्या लव्ह लाइफबाबत भाष्य केलं आहे.
5 / 8
यावर पलक म्हणाली, मलाही माझ्या लव्ह लाइफबाबत जाणून घ्यायचं आहे. मी सध्या सगळ्यांचीच काल्पनिक गर्लफ्रेंड झाली आहे. माझे सात बॉयफ्रेंड आहेत असे बोलले जाते. पण असे काहीच नाही.
6 / 8
पलकची आई श्वेता तिवारीला या अफेअर्सच्या चर्चांवर नेमके काय वाटतं? यावर पलक म्हणाली, मला आता माझ्या अफेअर्सच्या चर्चा ऐकायच्या नाहीत. माझ्या आईला असे वाटते की, मी वेगळ्या वळणावर गेलेली मुलगी आहे.
7 / 8
माझ्या अफेअर्सच्या चर्चा ऐकून ती मला एक एक मॅसेज पाठवते. आता हा कोण आहे? आता हा कुठून आला? असे ती मला सतत विचारत राहते.
8 / 8
यावर मी म्हणते, नाही यामधील कोणाबरोबरच माझे काही नाही. आपल्या मुलीच्या अफेअर्सच्या चर्चा ऐकून श्वेतावरही त्याचा परिणाम होत आहे.
टॅग्स :पलक तिवारीश्वेता तिवारी