‘मर्डर’नंतर लोकांनी नैतिकदृष्ट्या माझाही ‘मर्डर’ केला...! मल्लिका शेरावत बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:53 PM2021-05-26T17:53:02+5:302021-05-26T18:01:59+5:30

बॉलिवूडमध्ये अनेक नट्या आल्यात आणि काळासोबत अचानक गायब झाल्यात. मल्लिका शेरावत यापैकीच एक.

बॉलिवूडमध्ये अनेक नट्या आल्यात आणि काळासोबत अचानक गायब झाल्यात. मल्लिका शेरावत यापैकीच एक.

2003 मध्ये ‘ख्वाहिश’ या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. यानंतर 2004 साली आलेल्या ‘मर्डर’ या सिनेमातून ती एका रात्रीत स्टार झाली.

‘मर्डर’ने मल्लिकाला प्रसिद्धी दिली, ग्लॅमर, ऐश्वर्य मिळवून दिले़. पण सोबत लोकांची बोलणीही तिला ऐकावी लागली. त्यांची हेटाळणीही तिला सहन करावी लागली.

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मल्लिकाने याबद्दलचे दु:ख बोलून दाखवले.

‘मर्डर’मध्ये मी बोल्ड सीन्स दिल्यानंतर लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अचानक बदलला, असे तिने सांगितले.

‘मर्डर’नंतर नैतिकदृष्ट्या लोकांनी माझाही मर्डर केला होता. मला एक वाईट महिला समजू लागले होते. आज मात्र तसे बोल्ड सीन कॉमन गोष्ट झाली आहे, असे ती म्हणाली.

50 व 60 च्या दशकात महिलांसाठी चांगल्या भूमिका लिहिल्या जात. पण आता ती गोष्ट उरली नाही. मी अनेक वर्षे एका चांगल्या भूमिकेची प्रतीक्षा करत राहिले, असे ती म्हणाली.

मल्लिकाने मर्डरशिवाय बच के रहना रे बाबा, द मिथ, प्यार के साईड इफेक्ट्स, शादी से पहले, आपका सुरूर, दशावतार, हिस्स, डर्टी पॉलिटीक्स अशा अनेक सिनेमात काम केले आहे.