Join us  

Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनी देशभक्तीची भावना जागृत करणारे 'हे' चित्रपट जरुर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 5:00 PM

1 / 7
यंदाचा स्वातंत्र्यदिन 'विकसित भारत' या थीमवर आधारित आहे. अवघ्या दोन दिवसांवर स्वातंत्र्यदिन येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर हे देशभक्तीपर चित्रपट जरुर पाहा.
2 / 7
अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं कथानक सहमत नावाच्या एका काश्मिरी युवतीने खिळवून ठेवलं आहे. यात आलियाने एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचा विषय खूपच हृदयस्पर्शी आहे.
3 / 7
विकी कौशलचा 'उरी' चित्रपट २०१६ ला रिलीज झाला. हा चित्रपट उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्च पॅडवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे.
4 / 7
जेपी दत्ता दिग्दर्शित 'बॉर्डर' या चित्रपट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारा आहे. या चित्रपटाप्रमाणे त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. बॉर्डर सिनेमा १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे. हा सिनेमा म्हणजे एक माईलस्टोन होता. त्यावेळेस बॉर्डर सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.
5 / 7
'शहीद' हा चित्रपट भगतसिंग, राजगुरु तसेच सुखदेव यांच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित आहे. अभिनेते मनोज कुमार यांनी यामध्ये भगतसिंग यांची भूमिका साकारली आहे.
6 / 7
या चित्रपटामध्ये 'मेरा रंग दे बसंती चोला', 'वतन पे मरने वाले जिंदा रहेगा तेरा नाम' ही देशभक्तीपर गाणी लोकप्रिय आहेत. शिवाय 'शहीद' या चित्रपटाला सर्वात्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
7 / 7
'गदर- एक प्रेमकथा' या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यानची परिस्थिती दाखवण्यात आली.
टॅग्स :स्वातंत्र्य दिनबॉलिवूडसिनेमा