Ranbir Alia Wedding : शाही लग्नाचे शानदार फोटो! पाहा, रणबीर व आलियाच्या लग्नाचे तुम्ही न पाहिलेले Inside Pics By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 11:00 AM1 / 16रणबीर कपूर व आलिया भट या बॉलिवूडच्या क्यूट कपलनं काल लग्नाच्या आणाभाका घेतल्या. क्यूट कपलचे लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता या लग्नाचे इनसाईड फोटो समोर आले आहेत. (pic-Alia Bhatt Instagram)2 / 16 अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थित लग्नगाठ बांधल्यानंतर आलिया व रणबीर संध्याकाळी मीडियासमोर आले. दोघांनीही मीडियाला अशा मस्त पोझ दिल्यात. (pic-Instagram)3 / 16आलियाने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत. पण इनसाईड फोटोही असेच शानदार आहेत.4 / 16आलिया व रणबीरने केक कापून आनंद साजरा केला. यानंतर शॅम्पेनसह लग्न सेलिब्रेट केलं. (pic-Riddhima Kapoor Instagram)5 / 16आलिया व रणबीरच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. या फोटोत दोघंही एकमेकांमध्ये हरवलेले दिसताहेत.6 / 16रणबीरची बहिण रिद्धिमा कपूर हिने लग्नात धम्माल मज्जा केली. आलियाच्या लहान बहिणीसोबत तिने अशी मस्त सेल्फी घेतला. (pic-Riddhima Kapoor Instagram)7 / 16रणबीरचा खासम खास दोस्त अयान मुखजी आणि रिद्धिमा यांचीही धम्माल मस्ती केली. हा फोटो त्याचा पुरावा म्हणायला हवा. (pic-Riddhima Kapoor Instagram)8 / 16रिद्धिमाचा भावाच्या लग्नातील थाट बघण्यासारखा होता. तिने अशी मस्त पोझ दिली. (pic-Riddhima Kapoor Instagram)9 / 16रणबीर कपूरने काका रणधीर कपूर यांच्यासोबत फोटो काढून घेत, त्यांचे आशीर्वाद घेतले. करिनाने हा सुंदर फोटो शेअर केला आहे. (pic-kareena Kapoor Instagram)10 / 16लग्नात सहभागी झालेल्या खास पाहुण्यांनीही लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. नीतू कपूर यांनी हा सुंदर फोटो शेअर केला आहे. (pic-neetu Kapoor Instagram)11 / 16करिना कपूर व करण जोहर यांचा जलवा तर बघायलाच नको. बेबो व करणने लग्नात अशी मस्त पोझ दिली. (pic-kareena Kapoor Instagram)12 / 16बेबोचा लाडका जेह यानेही मामाच्या लग्नात एन्जॉय केलं. मॉम करिनासोबत मस्ती करतानाचा हा सुंदर फोटो. (pic-kareena Kapoor Instagram)13 / 16करिश्माने नववधू व वरासोबत मस्तपैकी फोटो काढून घेतला. तिघांनी अशी मस्त पोझ दिली. (pic-Karisma Kapoor Instagram)14 / 16बेस्ट सोबत बेस्ट, असं म्हणत आलियाची सावत्र बहिण पूजा भट हिने लग्नातला हा खास फोटो शेअर केला आहे. (pic-pooja bhatt Instagram)15 / 16या दोघी बहिणींचा हा फोटो तुम्ही बघायलाच हवा. पूजा व शाहिनने असा मस्त सेल्फी काढला. आम्ही आनंदी आहोत म्हणून..., असं कॅप्शन देत पूजाने हा फोटो शेअर केला आहे. (pic-pooja bhatt Instagram)16 / 16पूजाने रणबीर व आलियाच्या हवनपूजेचा फोटोही शेअर केला आहे. याच अग्नीला साक्षी मानत रणबीर व आलियाने लग्नगाठ बांधली. (pic-pooja bhatt Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications