Join us  

International Yoga Day 2024 : मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 1:22 PM

1 / 10
सिनेमा शूटिंग किंवा रोजच्या धावपळीतून वेळ काढत सेलिब्रिटीदेखील आवर्जून योग साधना करतात. फिटनेससोबच मनाची एकाग्रता आणि मन:शातीसाठी योगाचा उपयोग होतो.
2 / 10
फिटनेसच्या यादीत शिल्पा पहिल्या क्रमांकावर आहे. मनाच्या शांततेसाठी आणि शरीर सुधृढ राहावे यासाठी ती कायमच योगा करते.
3 / 10
या यादीत दुसरे नाव मलायका अरोरा हिचं आहे. मलायका बॉलिवूडची फिटनेस आयकॉन आहे. वय हा फक्त एक आकडा असल्याचं तिनं आपल्या फिटनेसने सिद्ध केलं आहे. अभिनेत्री नियमितपणे योगा करते.
4 / 10
अभिनेत्री आलिया भट ही उत्साही, निरोगी आयुष्य जगण्याची आकांक्षा बाळगणारी अशी अभिनेत्री असून चाहत्यांना ती नेहमीच प्रेरणा देते.
5 / 10
अभिनेत्री करीना कपूरदेखील नियमित योगा करते. करीना सडपातळ शरीरयष्टीसाठी आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी योगासनं करते.
6 / 10
अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही योगा करायला आवडतं. आजच्या काळात योग किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या चाहत्यांना योग करण्यासाठी प्रेरित करत असते.
7 / 10
अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील नियमित योगा करते. तिनं कायम योगाला कायम महत्व दिलं. फिट राहण्यासाठी अनुष्काचा योगा करण्यावर भर असतो.
8 / 10
सारा अली खानही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगाची मदत घेते. अभिनेत्री अनेकदा तिचे योगाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
9 / 10
या यादीत जान्हवी कपूरचाही समावेश आहे. जान्हवी कपूरदेखील फिटनेस फ्रिक आहे. जान्हवी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यावर आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगा करण्यावर विश्वास ठेवते.
10 / 10
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितदेखील बॉडी फ्लेक्सिबल आणि फिट ठेवण्यासाठी योगा करते.
टॅग्स :योगासने प्रकार व फायदेशिल्पा शेट्टीमलायका अरोराआलिया भटदीपिका पादुकोणकरिना कपूरअनुष्का शर्मासारा अली खानजान्हवी कपूर