वडिलांच्या फिटनेस कोचवर जडलं आयराचं प्रेम, आमिर खानची लेक आणि नुपूर शिखरेची हटके लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 1:38 PM1 / 8बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खान आज विवाह बंधनात अडकणार आहे. ती तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या हळदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता आमिरचे चाहते त्या दोघांच्या लग्नाच्या फोटोची वाट पाहत आहेत. 2 / 8आमिर खानची लेक आयराचा होणारा नवरा नुपूर शिखरे कोण आहे आणि त्यांची भेट कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यांची लव्हस्टोरी खूप हटके आहे. नुपूर शिखरे पेशाने फिटनेस ट्रेनर आहे. त्याने अनेक सेलेब्सच्या फिटनेससाठी मदत केली आहे.3 / 8नुपूर शिखरेचा जन्म १७ ऑक्टोबर १९८५ रोजी पुण्यात झाला. ५ फूट ७ इंच उंचीच्या ३७ वर्षीय नुपूरने फिटनेस ट्रेनर म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. आमिर खान, सुष्मिता सेन, टायगर श्रॉफ या कलाकारांनाही त्यांनी फिटनेसचे प्रशिक्षण दिले आहे.4 / 8२०२० साली लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा नुपूरसाठी तो टर्निंग पॉइंट ठरला. त्यावेळी नुपूर आमिरला फिटनेस ट्रेनिंग देत होता. लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आयरा वडिलांसोबत राहू लागली होती. नूपूर आणि आयराची पहिली भेट येथे झाली.5 / 8सुरुवातीला आयरानेही तिच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि नुपूरकडून फिटनेस टिप्स घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर महिनाभरातच दोघे चांगले मित्र बनले आणि हळूहळू प्रेम फुलू लागले. काही दिवसातच दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडू लागली आणि दोघांनीही एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली.6 / 8१९९७ मध्ये जन्मलेल्या आयरा खानने २०२१ साली नुपूर शिखरेसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यामध्ये २०२१ मध्ये त्यांच्या नात्याची सुरूवात झाल्याचे सांगितले. ती नुपूरला प्रेमाने 'पोपी' म्हणते. यानंतर, सप्टेंबर २०२१ मध्ये टेनिस सामन्यादरम्यान नूपुरने आयराला सर्वांसमोर प्रपोज केले आणि तिने हो म्हटले.7 / 8बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर नुपूर आणि आयराने लग्न करण्याचा निर्णय घेतला. १८ नोव्हेंबर रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला. एका इव्हेंटमध्ये आमिर खानने ते दोघे जानेवारीत लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते.8 / 8नुपूर आणि आयरा दोघेही त्यांच्या लग्नाबाबत खूप उत्सुक आहेत. ते दोघे इंस्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications