Join us

ते त्यांचे अखेरचे शब्द होते...! इरफानला आधीच लागली होती मृत्यूची चाहुल, बाबीलने सांगितला भावुक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 6:11 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेता इरफान खान आज आपल्यात नाही, पण त्याच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. दोन वर्षे इरफानने कॅन्सरशी झुंज दिली. पण अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली. 29 एप्रिल 2020 रोजी त्याने जगाचा निरोप घेतला.
2 / 8
उद्या 29 एप्रिलला इरफानच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर मुलगा बाबील याने वडिलांच्या अखेरच्या काळातील स्मृती शेअर केल्या आहेत.
3 / 8
फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत बाबीलने सांगितले, त्यांचे निधन होण्याच्या दोन-तीन दिवस आधीपासून मी त्यांच्यासोबत रूग्णालयात होतो. त्यांना कसलीच शुद्ध नव्हती. मी मरणार आहे, हे त्यांचे अखेरचे शब्द होते.
4 / 8
त्या दिवशी मी त्यांना भेटायला रूग्णालयात गेलो. मला पाहताच, ते माझ्याकडे पाहून नुसते हसले आणि मी मरणार आहे, असे म्हणाले. तुम्हाला काहीही होणार नाही, असे मी त्यावर त्यांना म्हणालो. माझ्या त्या वाक्यावर ते पुन्हा हसलेत आणि डोळे बंद करून झोपी गेलेत. ते त्यांचे अखेरचे शब्द होते, असे बाबीलने सांगितले़ हे सांगताना त्याचे डोळे पाणावलेत.
5 / 8
वडिलांच्या मृत्यूनंतर बाबील कमालीचा खचला होता. आजही वडिल सोडून गेलेत, यावर त्याचा विश्वास बसत नाही. वडिलांच्या अनेक आठवणी बाबील शेअर करत असतो.
6 / 8
1995 मध्ये इरफान व सुतापा यांचे लव्ह मॅरेज झाले होते. इरफान व सुतापाला आणखी एक मुलगा आहे. त्याचे नाव अयान.
7 / 8
अयान सध्या शिकतोय. ‘लाइफ ऑफ पाई’ या सिनेमात अयान आपल्या वडिलांसोबत म्हणजेच इरफानसोबत झळकला होता.
8 / 8
अनुष्का शर्माची निर्मिती असलेला बुलबुल हा चित्रपट प्रेक्षकांना गेल्या वर्षी पाहायला मिळाला होता. याच चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक एक नवीन चित्रपट घेऊन येत असून अनुष्काच या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अनुष्का या चित्रपटात एका नव्या अभिनेत्याला संधी देणार आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून इरफान खानचा मुलगा बाबील असल्याची चर्चा आहे
टॅग्स :इरफान खान