Ileana D'Cruz : इलियाना डिक्रूज बनणार कतरिना कैफची वहिनी? मालदीव व्हॅकेशनचे फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 1:21 PM1 / 8कतरिना कैफने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. कुठे तर दूर मालदीवला. होय, आपल्या कुटुंबीय व जवळच्या मित्रांसोबत कॅटच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन झाले. या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झालेत आणि या फोटोतील एका चेह-यानं सगळ्यांच लक्ष वेधलं.2 / 8होय, हा चेहर कुणाचा तर अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिचा. कतरिनाच्या बर्थ डे सेलिब्रेशन फोटोंमध्ये इलियाना कुठून आली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कनेक्शन आहे. होय, इलियाना कतरिनाचा भाऊ सॅबेस्टियनला डेट करत असल्याचं मानलं जात आहे.3 / 8 16 जुलै रोजी कतरिनानं मालदीवमध्ये आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कतरिनाबरोबर तिचा भाऊही आहे आणि त्याच्याबरोबरच इलियानाही या फोटोंमध्ये दिसत आहे. 4 / 8चर्चाा खरी मानाल तर इलियाना आणि सॅबेस्टियनला कतरिनाच्या मुंबई आणि लंडनच्या घरी पाहिल्याचं काही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून इलियाना आणि सॅबेस्टियन रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. 5 / 8सॅबेस्टियन लॉरेंट मिशेल हा व्यवसायाने मॉडेल आहे आणि तो ब्रिटनमध्ये राहतो. सोशल मीडियावरही हे दोघं एकमेकांना फॉलो करत आहेत. मालदीवमध्ये कतरिनाच्या फॅमिली, फ्रेंड्सबरोबर इलियाना होती याचाच अर्थ ती आणि सॅबेस्टीयनमध्ये नक्की काहीतरी नातं आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे.6 / 8इलियाना यापूर्वी विदेशी फोटोग्राफर अँड्यू निबॉनबरोबर रिलेशनशीपमध्ये होती. काही वर्षं एकमेकांसोबत राहिल्यानंतरही त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि ते नातं संपलं. एका इंटरव्ह्यूमध्ये इलियानानं आपलं ब्रेकअप झाल्याची कबुली दिली होती. 7 / 8 या ब्रेकअपनंतर इलियानाला सावरायला बराच वेळ लागला. पण आता तिच्या आयुष्यात सॅबेस्टियनची एन्ट्री झाल्याचं मानलं जात आहे. दोघंही एकमेकांसोबत आनंदी आहे.8 / 8अद्याप इलियानाने अधिकृतपणे या नात्याची कबुली दिलेली नाही. पण ही चर्चा खरी असेल तर इलियाना कतरिनाची वहिनी बनू शकते. आता कधी ते तर इलियाना स्वत:च सांगू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications