Join us

घटस्फोटावर ईशा कोप्पिकरचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "मी तयार नव्हते पण त्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 3:52 PM

1 / 8
'खल्लास गर्ल' म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री ईशा कोप्पिकर (Isha Koppikar) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ईशाचा घटस्फोट झाला.
2 / 8
ईशाने टिम्मी नारंगसोबत २००९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांनी तब्बल १४ वर्षांचा संसार मोडला आणि ते वेगळे झाले. ईशाला एक सात वर्षांची मुलगीही आहे जी सध्या तिच्याजवळ राहते.
3 / 8
घटस्फोट जाहीर केल्यानंतर ईशाने काहीही बोलण्यास नकार दिला होता. मात्र आता एक वर्षानंतर तिने या निर्णयावर मोकळेपणाने भाष्य केले आहे. तसंच घटस्फोटाचं कारणही स्पष्ट केलं आहे.
4 / 8
ईटाइम्सशी बोलताना ईशा म्हणाली, 'हा निर्णय घेताना मला खूप भीती वाटत होती. कारण पुन्हा आयुष्य कसं सुरु करेन याची मला कल्पनाच नव्हती. मी माझी लेक रिआनाला घेऊन नारंग हाऊसमधून बाहेर पडले.'
5 / 8
'रिआना खूप प्रोटेक्टिव्ह वातावरणात मोठी झाली होती. घरात सगळ्या सोयीसुविधा होत्या. आता वेगळं झाल्यानंतर हे सगळं मी तिला कसं देऊन शकेन असा प्रश्न मला पडला होता.'
6 / 8
'मी नारंग हाऊसजवळच एक फ्लॅट खरेदी केला. जेणेकरुन तिला वडील आणि चुलत भावाला कधीही भेटता येऊ शकेल. रिआनाला नवीन घर खूप आवडलं. टिम्मी तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी रोज यायचा. पती पत्नी म्हणून आम्ही वेगळे झालो असलो तरी आम्ही आमच्या मुलीचे आईवडील म्हणून सोबत आहोत आणि हे सत्य कधीच बदलणार नाही.'
7 / 8
'घटस्फोट न घेणं माझ्यासाठी सोपं होतं पण ते माझ्या तत्वात बसत नव्हतं. आम्ही एकमेकांच्या सहमतीने वेगळे झालो. मला काही प्रश्नांची उत्तरं हवी होती जी युनिव्हर्सने मला दिली. मी खूप अध्यात्मिक आहे. सोबत राहून सतत भांडणं करण्यात अर्थ नाही. एखादी गोष्ट तशीच ठेवली तर नंतर तिला वास येतो अगदी पाण्यालाही येतो. मला वाटतं आयुष्य हे वाहत जाण्यासाठी आहे.'
8 / 8
'टिम्मीने जेव्हा घटस्फोट जाहीर केला तेव्हा मी यासाठी तयारच नव्हते. तो खूप बेजबाबदारपणे वागला. कारण आपल्या मुलीला हळूहळू समजावं असं मला वाटत होतं. मला त्याच्याशी याविषयी बोलायचं होतं पण त्याआधीच तो जगाला सांगून मोकळा झाला. नंतर त्याला याची जाणीव झाली आणि त्याने माफी मागितली.'
टॅग्स :इशा कोप्पीकरबॉलिवूडघटस्फोटपरिवार