Join us

Jackie Shroff : हळव्या मनाचे जग्गू दादा; लहानपणी डोळ्यासमोर मोठा भाऊ बुडाला, आजही आठवणीत रडतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 2:22 PM

1 / 7
Jackie Shroff : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ हरफनमौला व्यक्ती आहेत. जॅकी गरजुंना मदत करण्यापासून कधीही मागे हटत नाहीत. जॅकी वास्तविक जीवनात एक रिअल जेंटलमन आहेत. आज जॅकी आरामाचे जीवन जगतात, पण लहानपणी जॅकीचे आयुष्य खूप गरिबीत आणि वेदनेत गेले आहे. जॅकी दहा वर्षांचे असताना, त्यांच्या डोळ्यासमोर 17 वर्षीय मोठ्या भावाचा मृत्यू झाला होता. हे दुःख आजही त्यांच्या मनाला खूप वेदना देत आहे.
2 / 7
जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबईतील एका चाळीत झाला होता. त्यांचे खरे नाव 'जय किशन काकुभाई श्रॉफ' आहे. मित्राच्या सांगण्यावरुन आपले नाव जॅकी श्रॉफ केले होते. लाडाने आज जॅकीला सर्वजण जगगू दादा म्हणतात. जॅकीला लहानपणी त्यांच्या ज्योतिष वडिलांनी एक इशारा दिला होता, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि मोठी घटना घडली. वडिलांच न ऐकण्याचा आजही त्यांना पश्चात्ताप होतो.
3 / 7
2021 मध्ये जॅकी श्रॉफ अभिनेत्री आणि लेखक ट्विंकल खन्नाच्या 'ट्विंक इंडिया' कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल खूप माहिती दिली. यावेळी त्यांनी लहानपणीची दुःखद घटना सांगितली. त्यांच्या मोठ्या भावाचा डोळ्यासमोर मृत्यू झाला आणि जॅकी काहीही करू शकले नाहीत.
4 / 7
जॅकीने सांगितले की, ते मोठ्या भावासोबत बाहेर फिरायला जात होते, तेव्हा वडिलांनी बाहेर न जाण्याचा इशारा दिला होता. वडील म्हणाले होते की, आजचा दिवस वाईट आहे, बाहेर जाऊ नका. परंतु भावाने आणि त्यांनी त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले बाहेर निघाले. ते दोघे समुद्रकिनारी बसले होते, यावेळी त्यांना समुद्रात एक व्यक्ती बुडत असल्याचे दिसले.
5 / 7
भावाला पोहता येत नव्हते, तरीदेखील त्याने व्यक्तीला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. तो व्यक्ती वाचला पण जॅकी दादाचा भाऊ बुडला. ही संपूर्ण घटना लहान जॅकीच्या डोळ्यासमोर घडली. भावाला बुडताना पाहून जॅकीने त्याच्याकडे एक केबल वायर फेकले, परंतु प्रयत्न व्यर्थ ठरला आणि ते आपल्या भावाला वाचवू शकले नाही. भावाच्या मृत्यूने जॅकीच्या मनावर खूप खोलवर परिणाम केला.
6 / 7
जॅकीच्या वडिलांचा इशारा खरा ठरला, तेव्हापासून जॅकीचा ज्योतिषावर विश्वास वाढला. ते सांगतात की, त्यांच्या वडिलांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. त्यांचे वडील अंबानी कुटुंबाच्या जवळ होते आणि त्यांनी कोकिलाबेन अंबानी यांना सांगितले होते की, तुमचे पती खूप मोठे व्यक्ती होतीलल. आणि नंतर धीरुभाई यांचे नाव जगभरात गाजले.
7 / 7
जॅकी श्रॉफ यांनी मॉडेलिंग आणि जाहिरातींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1983 मध्ये चित्रपट निर्माते सुभाष घैय यांनी आपल्या प्रसिद्ध चित्रपट हिरोसाठी जॅकीला साई केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला. 'हिरो' नंतर, जॅकीने 'राम लखन,' कर्मा ',' सौदागर ',' ट्रिमूर्ती', सारख्या 200 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. चाळीत राहणारे जॅकी आता कोट्यधीश आहेत.
टॅग्स :जॅकी श्रॉफबॉलिवूडटायगर श्रॉफ