PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; जान्हवी कपूरच्या Look ने लावलंय साऱ्यांना वेड! By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 4:18 PM1 / 10 बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2 / 10 सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती विविध ठिकाणी भेटी देत आहे. यादरम्यान तिचे अनेक स्टनिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 3 / 10अभिनेत्री तिच्या स्टायलिश ड्रेसिंग सेन्सने तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. या फोटोत जान्हवी क्लासी साडी लूकमध्ये दिसतेय.4 / 10सोशल मीडियावर जान्हवीचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांना तिचे फोटो पसंत पडत आहेत. 5 / 10 नुकताच जान्हवीने प्रमोशन दरम्यान आकर्षक पोशाख परिधान केला आहे. जान्हवीकडे पाहिल्याने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण येत आहे.6 / 10 जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर पांढऱ्या आणि फिकट निळ्या रंगाच्या सुंदर लेंहेग्यामधील काही फोटो शेअर केले आहेत.7 / 10 तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सुंदर साडीवर जान्हवीने नाजूक गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे. 8 / 10 या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूरने कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.9 / 10जान्हवीने या साडीसह तिचे केस मोकळे सोडले होते. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली. 10 / 10या लुकसाठी जान्हवीने हलका मेकअप केला होता. या लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications