Janhvi Kapoor glamorous photos looks stylish in Neon color dress
जान्हवी कपूरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, नियॉन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली खूप स्टायलिश By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 06:13 PM2021-02-24T18:13:14+5:302021-02-24T18:13:14+5:30Join usJoin usNext नुकतेच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोत जान्हवी कपूरने नियॉन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती छान पोझ देताना दिसते आहे. जान्हवी कपूरने सोशल मीडियावर कधी आपल्या ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस अंदाजात तर कधी बोल्ड अंदाजात धुमाकूळ घालताना दिसते. जान्हवी कपूरने फार कमी वेळात अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. जान्हवी कपूरचा जन्म ६ मार्च, १९९७ साली मुबंईत झाला होता. जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आहेत आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी तिची आई आहे. जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून अभिनय कारकार्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर ती गुंजन सक्सेना चित्रपटात झळकली. जान्हवी कपूर राजकुमार रावसोबत रुही चित्रपटात दिसणार आहे. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर तिचे ९.५ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.टॅग्स :जान्हवी कपूरJanhavi Kapoor