Join us

जान्हवी कपूर 'मिसेस पहाडिया' होण्यासाठी तयार? 'शिखू' वरचं प्रेमही केलं जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 2:49 PM

1 / 8
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक अशीच ओळख न ठेवता तिला स्वत:चं नाव कमवायचं आहे.
2 / 8
जान्हवी सध्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमामुळे चर्चेत आहे. यात तिने क्रिकेटपटूची भूमिका साकारली आहे. राजकुमार रावसोबत तिची जोडी जमली आहे.
3 / 8
जान्हवीने या सिनेमासाठी जोरदार मेहनत घेतल्याचं ती सांगते. क्रिकेटचं प्रशिक्षण घेताना तिचे अनेक बॉडी पार्ट्स डिस्लोकेट झाले. बऱ्याच कठीण प्रसंगातून तिने सिनेमाचं शूट केलं.
4 / 8
जान्हवी प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतानाच वैयक्तिक गोष्टींमुळेही लक्ष वेधून घेते. 'शिखू' नावाचं पेंडंट गळ्यात घालून तिने जणू शिखर पहाडियासोबतची रिलेशनशिप जाहीरच केली आहे.
5 / 8
शिखर पहाडिया हा तिचा खूप जुना मित्र आहे. २०१५ ला ते रिलेशनशिपमध्ये आले. मध्यंतरी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. मात्र शिखरने जान्हवीची कायम वाट पाहत राहिला. अखेर जान्हवी जुन्या प्रेमाकडे परत आली.
6 / 8
सध्या जान्हवी आणि शिखरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय. यावर नुकतंच अभिनेत्रीने मौन सोडलं असून ती कधी लग्न करणार हे सांगितलं आहे.
7 / 8
जान्हवी म्हणाली, 'दर आठवड्याला माझ्या लग्नाची बातमी छापून येत आहे. पण मला हे मान्य नाही. मला सध्या फक्त काम करायचं आहे.' असं म्हणत जान्हवीने लग्नाच्या बातम्यांचं खंडन केलं आहे.
8 / 8
जान्हवीने 2018 साली 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता ती साऊथ इंडस्ट्रीतही दिसणार आहे. 'देवरा पार्ट 1' मध्ये ती ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार आहे. तर वरुण धवनसोबत तिचा 'तुल
टॅग्स :जान्हवी कपूररिलेशनशिपलग्नबॉलिवूड