'जवान'साठी गिरीजाला मिळालं किरकोळ मानधन?; इतर कलाकारांच्या तुलनेत घेतली इतकी कमी फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 09:18 IST
1 / 7सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानच्या जवान सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं ते पाहुयात.2 / 7या सिनेमामध्ये शाहरुखची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे त्याने सर्वाधिक मानधन घेतलं आहे. या सिनेमासाठी त्याने ४० कोटी रुपये फी आकारली आहे.3 / 7या सिनेमात नयनतारादेखील स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटासाठी तिने ११ कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे.4 / 7साऊथ स्टार विजय सेतुपतीदेखील या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमासाठी त्याने २१ कोटी रुपये घेतले.5 / 7प्रियामणी हिने या सिनेमासाठी केवळ २ कोटी रुपये मानधन आकारलं आहे.6 / 7बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने या सिनेमासाठी १ ते २ कोटी घेतल्याचं सांगण्यात येतं.7 / 7अलिकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये गिरीजा हटके अंदाजात दिसली. या सिनेमासाठी तिने नेमकं किती मानधन घेतलंय याचा ठोस आकडा समोर आलेला नाही. मात्र, तिला केवळ लाखांच्या घरात फी दिल्याचं म्हटलं जात आहे.