खलनायकाच्या पत्नीचं अफलातून सौंदर्य, जयकांत शिक्रेची बायको 'लय भारी' By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 8:00 AM1 / 8हिंदी चित्रपटसृष्टीत प्रकाश राजने वॉन्टेड सिनेमातून एंट्री केली. या सिनेमातील प्रकाश राजने साकारलेला खलनायक रसिकांना चांगलाच भावला. पहिल्याच हिंदी सिनेमातून त्याने रसिकांवर जादू केली. 2 / 8यानंतर सिंघम सिनेमातील जयकांत शिखरे तर रसिक विसरुच शकणार नाहीत. प्रकाश राजने साकारलेला जयकांत शिखरे रसिकांच्या मनात घर करुन गेला आहे. 3 / 826 मार्च 1965 रोजी कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये जन्म झालेला प्रकाश राज गेली अनेक वर्षे दाक्षिणात्य सिनेमात सक्रीय आहे. दूरदर्शनवरील मालिकेतून त्याला अभिनयाची संधी मिळाली होती.4 / 8बॉलीवुड आणि दाक्षिणात्य सिनेमात अभिनेता साकारण्यासोबत दिग्दर्शक तसंच निर्माता म्हणूनही त्याने जबाबदारी पार पाडली आहे. हे तर झालं प्रकाश राजच्या व्यावसायिक जीवनाविषयी. 5 / 8त्याचं खासगी आणि वैयक्तीक जीवनही तितकंच सुंदर आहे. त्याच्या वैयक्तीक जीवनाच्या सुंदरतेचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची पत्नी पोनी वर्मा. गेल्या काही महिन्यांत पोनी वर्माच्या सौंदर्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. 6 / 8प्रकाश राज याची पहिली पत्नी ललिता कुमारी होती. 1994 साली त्याने ललिताशी लग्न केलं होतं. मात्र 2009 साली दोघांनी काडीमोड घेतला. यानंतर 2010 साली प्रकाश राजच्या जीवनात पोनी वर्माची एंट्री झाली आणि दोघांनी रेशीमगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला. 7 / 8पोनी वर्मा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. बॉलीवुडच्या अनेक सिनेमात पोनी वर्माने कोरिओग्राफर म्हणून जबाबदारी पार पडली आहे. पोनी वर्मा सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. 8 / 8आपल्या पतीसह आकर्षक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो पाहून तुम्हीही पोनीच्या सौंदर्यावर फिदा व्हाल. तिचे घायाळ करणारे सौंदर्य कमाल आहे असे शब्द तुमच्या ओठावर आपसुकच येतील. आणखी वाचा Subscribe to Notifications