करिनासोबत स्क्रीनवर रोमान्स करता करता खरंच तिच्या प्रेमात पडला होता तुषार कपूर! By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 12:07 PM1 / 7अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर आज(२० नोव्हेंबर)ला ४४ वर्षांचा झाला. यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये शिकलेल्या तुषारचा जन्म २० नोव्हेंबर १९७६ मध्ये झाला होता. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात २००२ मध्ये करिना कपूरच्या अपोझिट 'मुझे कुछ कहना है' मधून केली होती. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी तुषार बेस्ट मेल डेब्यू अॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पण तुषारचे यानंतरचे सिनेमे फ्लॉप झालेत.2 / 7'मुझे कुछ कहना है' नंतर तुषार कपूरने करिनासोबत आणखी काही सिनेमात काम केलं. ही जोडी चांगलीच गाजली होती. स्क्रीनवर करिनासोबत रोमान्स करता करता तुषार रिअल लाइफमध्येही तिच्या प्रेमात पडला होता. इतकेच नाही तर त्याला तिच्यासोबत लग्नही करायचं होतं.3 / 7मात्र, तुषारची लव्हस्टोरी जास्त पुढे जाऊ शकली नाही. याचं कारण जेव्हा करिना तुषारसोबत 'जीना सिर्फ मेरे लिए' चं शूटींग करत होती तेव्हा हृतिक रोशनसोबत अफेअरची चर्चा सुरू झाली होती.4 / 7एकत्र दोन फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर करिनाने तर आपलं करिअर सांभाळलं पण तुषार कपूरचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपलं होतं. एका मुलाखती दरम्यान जेव्हा तुषारला लग्नाबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला होता की, त्याला लाइफ पार्टनर म्हणून करिना सारखा मुलगी हवी आहे.5 / 7आता तुषार ४४ वर्षांचा झाला तरी त्याने लग्न केलेलं नाही. मात्र, सरोगसीच्या माध्यमातून तो एक मुलाचा पिता झाला आहे. तेच दुसरीकडे अनेक अफेअर्सनंतर करिनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं आणि तिलाही एक मुलगा आहे. आता ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे. 6 / 7दोघांचा 'मुझे कुछ कहना है' हा एक रोमॅटिक कॉमेडी सिनेमा होता. यात तुषारने डेब्यू केलं होतं. तर करिनाचा हा दुसरा सिनेमा होता. या सिनेमाचं दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केलं होतं तर निर्मात वासु भगनानी होते.या सिनेमावेळी करिना फारच सडपातळ होती. आता करिनाला पाहिलं तर फारच ग्लॅमरस दिसते आणि ती आपल्या फिटनेसची खास काळजी घेते.7 / 7तुषार आता अभिनय सोडून निर्माता झाला आहे. तुषार अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' सिनेमाचा को-प्रोड्युसर आहे. दुसरीकडे करिना कपूर आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने शूटींग पूर्ण केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications