झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 2:05 PM1 / 10जीतू भैया या नावाने चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता जितेंद्र कुमार इंडस्ट्रीतील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहे. त्याच्या नवीन मुलाखतीत त्याने घरं आणि नात्याबद्दल सांगितलं आहे.2 / 10सायरस ब्रोचा यांच्याशी झालेल्या संवादात जितेंद्र कुमारने सांगितलं की, त्याच्या आयुष्यात एक क्षण असाही आला जेव्हा त्याला काही महिने जंगलात एका झोपडीत राहावं लागलं.3 / 10अभिनेत्याने म्हटलं की, त्याचा जन्म राजस्थानमधील अलवर येथील खैरथल येथे झाला. 'आमची जंगलात एक झोपडी होती. आमची जॉईन्ट फॅमिली तिथे राहायची.'4 / 10'आमच्याकडे एक पक्क घर आणि एक झोपडी होती. मला अजूनही आठवतं की, मी तिथे झोपायचो आणि मला विचित्र वाटायचं. पण हे काही काळासाठीच होतं.'5 / 10'माझे वडील आणि काका सिव्हिल इंजिनिअर आहेत आणि मीही. त्यांनी लवकरच आणखी दोन खोल्या बांधल्या. त्यामुळे आम्ही सहा-सात महिने झोपडीत राहिलो, त्यानंतर घराचं बांधकाम सुरू झालं.'6 / 10'वयाच्या ११ व्या वर्षी पेंटर आणि कारपेंटर यांच्याकडे रोजंदारी मजूर म्हणून काम करत असे. या गोष्टीमुळे वडील फार नाराज झाले होते.'7 / 10'उन्हाळ्याच्या सुटीत मी पेंटर, कारपेंटर यांच्यासह मजुरीचं काम करायचो. मला दिवसाला ४० रुपये मिळायचे. मग माझ्या वडिलांना कळलं आणि ते मला ओरडले' असं अभिनेत्याने म्हटलं आहे. 8 / 10जितेंद्र कुमार 'कोटा फॅक्टरी' आणि 'पंचायत' सारख्या सीरीजसाठी ओळखला जातो. त्याने 'शुभ मंगल ज्यादा सावधान'सह इतर चित्रपटांमध्येही काम केलं आहे.9 / 10जितेंद्र कुमारचे असंख्य चाहते असून तो नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतो. त्याचे जबरदस्त फोटो शेअर करत असतो.10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications